क्रिकेट इतिहासातील महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांचा रविवारी (27 ऑगस्ट) 115 वा जन्मदिवस आहे. त्यांनी क्रिकेटमध्ये 20 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत केलेले अनेक विक्रम आजही अबाधित आहेत. विसाव्या शतकातील दिग्गज फलंदाज म्हणून ओळखले जाणाऱ्या ब्रॅडमन यांनी 1928ला इंग्लंड विरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण केले तर 1948 ते इंग्लंडविरुद्धच शेवटचा कसोटी सामना खेळले.
महान खेळाडू ब्रॅडमन यांच्याबद्दल या काही खास गोष्टी-
– ब्रॅडमन यांचा जन्म 27 ऑगस्ट 1908ला झाला असून त्यांचे पूर्ण नाव डोनाल्ड जॉर्ज ब्रॅडमन असे आहे.
-त्यांनी 52 कसोटी सामन्यात 80 डावात खेळताना ब्रॅडमन यांनी 29 शतके आणि 13 अर्धशतकांसह 99.94 च्या सरासरीने 6996 धावा केल्या आहेत.
– 10 वर्षांचे असताना ब्रॅडमन हे स्पर्धात्मक टेनिस खेळायचे.
– पण त्यानंतर त्यांनी वयाच्या 11 व्या वर्षी बॉरल येथील ग्लेब पार्कवर पहिला क्रिकेटचा सामना खेळला ज्यात त्यांनी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना नाबाद 55 धावा केल्या.
-त्यानंतर 1 वर्षांनी बॉरल हायस्कुलच्या वरिष्ठ संघाकडून खेळताना त्यांनी त्यांचे क्रिकेटमधील पहिले शतक झळकावले.
#OnThisDay in 1908, Donald Bradman was born!
His Test record with the bat 👇
▶️ 6996 runs
▶️ 334 top score
▶️ 99.94 average
▶️ 29 Test centuriesThe greatest ever? pic.twitter.com/ckVdcmKyfF
— ICC (@ICC) August 27, 2019
– 16 डिसेंबर 1927 ला प्रथम श्रेणी क्रिकेटच्या पदार्पणाच्या सामन्यात ऍडलेड ओव्हल मैदानात त्यांनी दक्षिण ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना 118 धावांची खेळी केली होती. त्यावेळी ते प्रथम श्रेणी क्रिकेटच्या पदार्पणात शतक करणारे ते 20 वे ऑस्ट्रेलियन खेळाडू होते.
– वयाच्या 20 व्या वर्षी त्यांची ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघात निवड झाली. त्यांनी 30 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 1928 दरम्यान पार पडलेल्या इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.
– ते ऑस्ट्रेलियाचे कसोटी क्रिकेटमध्ये नेतृत्व करणारे 21 वे कर्णधार होते.
– ब्रॅडमन कसोटीमध्ये कधीही यष्टीचीत झाले नाही.
#OnThisDay in 1908, a legend was born.
52 Tests, 6,996 runs, 29 centuries, 13 fifties, a high score of 334.
An unmatched average of 99.94.The one and only, Sir Don Bradman. pic.twitter.com/vwUwroQcDj
— ICC (@ICC) August 27, 2018
-सार्वकालिन कसोटी क्रमवारीतही डॉन ब्रॅडमन 961 गुणांसह अव्वल स्थानी आहेत.
-एकाच कसोटी सामन्यात दोन वेळा शतक आणि शून्य धावेवर बाद होणारे ब्रॅडमन हे एकमेव ऑस्ट्रेलियन खेळाडू आहेत.
#OnThisDay in 1948, Sir Don Bradman walked out at The Oval for his final Test innings, needing just 4 runs to maintain an average over 100…
You know what happened next…
The most famous 🦆 in cricket history? pic.twitter.com/GoCZivgMyt
— ICC (@ICC) August 14, 2018
-ब्रॅडमन यांची 99.94 ही क्रिकेट इतिहासातील सर्वाच्च फलंदाजी सरासरी आहे. तसेच त्यांच्या जवळपासही कोणत्या फलंदाजाची सरासरी नाही. कसोटी क्रिकेटमध्ये ब्रॅडमननंतर सर्वोच्च सरासरी ही सध्या इंग्लंडचा फलंदाज हॅरी ब्रूक याची आहे. त्याची सरासरी 62.15 इतकी आहे. त्यापाठोपाठ ऍडम वोग्सची आहे. त्याची सरासरी 61.87 आहे.
हेही वाचा-
अन् डॉन ब्रॅडमन भारताच्या महान फलंदाजाला शिवसेना व बाळासाहेबांबद्दल विचारत होते…
सर डॉन ब्रॅडमन यांच्या फलंदाजीचा 74 वर्षे जुना एकमेव रंगीत व्हिडिओ पाहिलाय का? नसेल, तर लगेच पाहा