आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे अनेक क्रिकेटपटू आहेत, ज्यांनी क्रिकेट खेळण्यासाठी दुसऱ्या देशात स्थलांतर केले आहे. असेच एक पाकिस्तानी क्रिकेटपटू होऊन गेले ज्यांचा जन्म भारतात झाला होता. परंतु त्यांनी क्रिकेट खेळण्यासाठी पाकिस्तानमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. इतकेच नव्हे तर नवव्या क्रमांकावर येऊन त्यांनी तुफानी शतक देखील झळकावले होते. याच क्रिकेटपटूचा आज (६ जून) वाढदिवस आहे.
पाकिस्तान संघासाठी ५८ कसोटी सामने आणि १० एकदिवसीय सामने खेळलेल्या आसिफ इकबाल यांचा जन्म ६ जून १९४३ रोजी हैदराबाद मध्ये झाला होता. त्यांनी भारतात प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले होते. परंतु त्यानंतर त्यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन खेळण्याचा निर्णय घेतला होता. आसिफ यांनी आपल्या कारकीर्दीत हैदराबाद, कराची, केंट, नॅशनल बँक ऑफ पाकिस्तान आणि पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्ससाठी क्रिकेट खेळले. हैदराबादमध्ये क्रिकेटचे धडे गिरवल्यानंतर त्यांनी पाकिस्तान संघासाठी क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती.
त्यांनी १९६४-६५ मध्ये ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध झालेल्या मालिकेत आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. पाठीत होत असलेल्या त्रासामुळे त्यांनी गोलंदाजी न करता फलंदाजीवर अधिक लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला होता. १९६७ मध्ये इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्यांनी ९ व्या क्रमांकावर फलंदाजी करताना १४६ धावांची तुफानी खेळी केली होती.
आसिफ यांचे सानिया कनेक्शन
आसिफ इकबाल हे प्रसिद्ध भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा हिचे काका आहेत. भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार गुलाम अहमद यांच्यामुळे हे नातेसंबंध जोडले गेले होते. गुलाम अहमद यांची सासूबाई आणि सानिया मिर्झाच्या वडिलांची आई या दोघीही बहिणी होत्या. म्हणून आसिफ इकबाल हे गुलाम अहमद यांचे पुतणे आहेत. त्यावरून आसिफ आणि सानिया हे काका आणि भाची झाले.
आसिफ इकबाल यांची कारकीर्द
आसिफ इकबाल यांनी आपल्या कारकीर्दीत एकूण ५८ कसोटी सामने खेळले आहेत. यात त्यांनी ३८.८५ च्या सरासरीने ३५७५ धावा केल्या. यात १२ शतक आणि ११ अर्धशतकांचा समावेश आहे. तर वनडे क्रिकेटबद्दल बोलायचं झालं तर, त्यांनी १० वनडे सामन्यात ५५ च्या सरसरीने ३३० धावा केल्या आहेत. त्यांनी आपल्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत ४४० सामन्यात एकूण २३३२९ धावा केल्या आहेत.
याशिवाय त्यांनी कसोटीत ५३ विकेट्स आणि वनडेत १६ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये २९१ विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
एकेवेळी ३ बाऊंसर हेल्मेटला लागल्यामुळे रडणारा खेळाडू ते भारतीय संघाचा उपकर्णधार ‘अजिंक्य रहाणे’
दक्षिण आफ्रिकेसाठी धोक्याची घंटी! Team Indiaच्या प्रमुख खेळाडूने सुरू केलाय सराव, पाहा Video