भारताची स्टार कुस्तीपटू बबीता फोगट आज (20 नोव्हेंबर) 33वा वाढदिवस साजरा करत आहे. हरियाणातील एका गावातून आलेल्या बबीताने तिच्या वडीलांच्या मार्गदर्शानाखाली आजपर्यंतच्या कारकिर्दीत यशाची अनेक मोठी शिखरे गाठली आहेत. तिचे राष्ट्रीय तसेच जागतिक स्तरावरही अनेक पदकांची कमाई करत देशाचा सन्मान वाढवला आहे.
तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्याबद्दलच्या काही खास गोष्टी जाणून घेऊ –
-बबीताचा जन्म 20 नोव्हेंबर 1989 ला हरियाणातील भीवनी गावात झाला. तिला गीता ही मोठी बहिण आणि रितू व संगीता या दोन लहान बहिणी आहेत. विशेष म्हणजे बबीतासह तिच्या सर्व बहिणी कुस्तीपटू आहेत.
-तिचे वडील महावीर सिंग फोगट हे देखील कुस्तीपटू होते. पण त्यांना मोठ्या स्तरावर कुस्ती खेळता न आल्याने त्यांच्या त्यांच्या मुलींना कुस्तीपटू बनवण्याचे ठरवले. त्यामुळे त्यांनीच बबीता आणि तिची मोठी बहिण गीता यांना लहानपणी प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. त्यांच्यानंतर त्यांनी रितू आणि संगीता या दोघींनाही कुस्तीचे धडे दिले. मुली कुस्ती खेळतात म्हणून अनेकदा त्यांच्या कुटुंबाला अपमानही सहन करावा लागला. पण या सर्व अडचणींवर मात करत फोगट बहिणींनी यश मिळवले.
-बबीताला मॅटवरील कुस्तीमध्ये पहिले मोठे यश 2009 च्या राष्ट्रकुल चॅम्पियनशीप स्पर्धेत मिळाले. तिने 51 किलो वजनी गटात फ्रिस्टाईलमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली होती.
-साल 2009 च्या यशानंतर बबीताने 2010 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई केली. तर 2014 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत तिला सुवर्णपद मिळाले. 2018 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत तिने पुन्हा रौप्यपदक मिळाले. याव्यतिरिक्त तिने 2011 च्या राष्ट्रकुल चॅम्पियनशीपमध्येही सुवर्णपदक मिळवले होते. तर 2012 ला तिने विश्व कुस्ती चॅम्पियनशीपमध्ये कांस्य पदक मिळवले. त्याचबरोबर 2013 ला दिल्ली येते झालेल्या एशियन चॅम्पियनशीपमध्ये तिने कांस्यपदक मिळवले.
-साल 2016 मध्ये तिच्यावर आणि तिची मोठी बहिण गीतावर आधारित ‘दंगल’ हा चरित्रपटही आला होता. या चित्रपट मोठ्या प्रमाणात लोकप्रियही झाला.
-तिने सन 2019 ला विविके सुहागशी लग्न केले. विवेक हा देखील कुस्तीपटू आहे.
-सन 2019 मध्ये ‘नच बलिये’ या रिऍलिटी शोमध्येही बबीता आणि विवेक सहभागी झाले होते.
-बबीताने कुस्तीपाठोपाठ सन 2019 ला राजकरणातही पाऊल टाकले होते. तिने भारतीय जनता पक्षात प्रवेश करत ऑगस्ट 2019मध्ये दादरी येथून विधानसभा निवडणूकही लढली होती. मात्र तिला पराभवाचा सामना करावा लागला.
-बबीताला 2015 मध्ये अर्जून पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. तर तिचे वडील महावीरसिंग फोगट यांना 2016 मध्ये द्रोणाचार्य पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
‘मी स्वप्नातही सूर्यकुमारसारखे शॉट मारू नाही शकत’, न्यूझीलंडच्या दिग्गज फलंदाजाची कबुली
भारतीय महिला कुस्तीपटूच्या मृत्यूची पसरली होती अफवा, दुसऱ्या दिवशी तिनेच जिंकले सुवर्ण पदक