शनिवारी (दि. 05 ऑगस्ट) भारताचा माजी गोलंदाज वेंकटेश प्रसादचा 54 वा वाढदिवस. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळताना पाकिस्तानी फलंदाजांसाठी नेहमीच डोकेदुखी ठरलेल्या प्रसादने 33 कसोटीत 96 विकेट्स, तर 161 वनडेत 196 विकेट्स घेतल्या आहेत.
अशा या भारताच्या वेगवान गोलंदाजाविषयीच्या खास गोष्टी-
-प्रसादचा जन्म 5 ऑगस्ट 1969ला कर्नाटकमधील बेंगलोर येथे झाला.
-त्याचे पूर्ण नाव बापू कृष्णराव वेंकटेश प्रसाद असे आहे.
-त्याने भारताकडून 2 एप्रिल 1994 रोजी न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. यानंतर 2 वर्षांनी जून 1996ला त्याने भारताच्या कसोटी संघातही स्थान मिळवले.
-त्याने त्याच्या पहिल्याच कसोटी सामन्यात इंग्लंड विरुद्ध पहिल्या डावात 4 विकेट्स तर दुसऱ्या डावात 2 विकेट्स अशा मिळून एकूण 6 विकेट्स मिळवल्या.
-प्रसाद हा 1999 साली चेन्नई येथे झालेल्या पाकिस्तान विरुद्धच्या कसोटी सामन्यात दुसऱ्या डावात शून्य धावा देत घेतलेल्या 5 विकेट्ससाठी ओळखला जातो. या डावात त्याने एकूण 33 धावात 6 विकेट्स घेतल्या होत्या.
Happy Birthday to former India opening bowler Venkatesh Prasad, who took 292 international wickets pic.twitter.com/7EEVqpFi20
— ICC (@ICC) August 5, 2016
-प्रसादला 2000 साली अर्जून पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
-त्याने भारताचे 1994 ते 2001 असे 7 वर्ष प्रतिनिधित्व केले आहे. यात त्याला दोन वेळा सामनावीराचा पुरस्कार मिळाला आहे.
-प्रसादने 1999 च्या विश्वचषकात पाकिस्तान विरुद्ध अमिर सोहिलची घेतलेली विकेट प्रसिद्ध आहे. सोहिलने बाद होण्याआधीच्या चेंडूवर चौकार मारला होता आणि प्रसादला ज्या बाजूला चौकार मारला तिकडे बॅट दाखवत डिवचले होते. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर प्रसादने त्याला त्रिफळाचीत केले होते.
This moment is etched forever in every cricket fan's minds. Perfect time to take everyone in a rewind!!! Happy Birthday Venkatesh Prasad! pic.twitter.com/53tudIiSA4
— BCCI (@BCCI) August 5, 2019
-निवृत्तीनंतर प्रसादने अनेक संघांसाठी गोलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका निभावली आहे. तो 2007 च्या पहिल्या टी20 विश्वचषकाचे विजेतेपज मिळवलेल्या भारतीय संघाचा त्यावेळी गोलंदाजी प्रशिक्षक होता.
– त्याने आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्ज, किंग्स इलेव्हन पंजाब आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचेही गोलंदाजी प्रशिक्षकपद सांभाळले आहे.
-त्याने 2014 ला प्रदर्शित झालेल्या सचिन! तेंडुलकर अल्ला या कन्नड चित्रपटात काम केले आहे.
– प्रसादने युवा भारतीय संघाच्या निवड समितीचे अध्यक्षपदही सांभाळले होते. 2018 ला 19 वर्षांखालील विश्वचषकाचे विजेतेपद मिळवणाऱ्या भारतीय संघाची निवड प्रसाद अध्यक्ष असलेल्या निवड समितीने केली होती. (Birthday Special: 5 facts about Venkatesh Prasad)
महत्त्वाच्या बातम्या-
गोष्ट एका क्रिकेटरची भाग 19: पाकिस्तानला नेहमीच घाम फोडणारा वेंकटेश प्रसाद
पाकिस्तानच्या आमीर सोहेलला ‘पेहली फुरसत से निकल’ म्हणणारा वेंकटेश प्रसाद
मुछे हो तो नत्थूलाल जैसी अन् क्रिकेटर असावा तर लालाजींसारखा, ब्रॅडमन यांना केलेलं हिटविकेट