ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या वनडे सामन्यात एक मजेदार घटना घडली. दोन्ही संघांनी या सामन्यादरम्यान अशा काही चुका केल्या, ज्या गली क्रिकेटमध्येही पाहायला मिळत नाहीत. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन पहिल्याच षटकात बाद होता होता थोडक्यात बचावला. मात्र, हा व्हिडीओ पाहिल्यावर कोणीही आपले हसू राहू शकणार नाही. तसेच या गोष्टीचा देखील अनेक जण विचार करतील की, यावर कोणी बाद कसे झाले नाही.
धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या न्यूझीलंड संघाच्या पहिल्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर असे काही घडले, जे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये क्वचितच घडते. मिचेल स्टार्क गोलंदाजी करत होता आणि त्याच्यासमोर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन होता. स्टार्कने एक लेंथ बॉल टाकला, जो विल्यमसनने कव्हर क्षेत्ररक्षकाच्या दिशेने खेळला. विल्यमसन बॅटचा चेंडूला स्पर्श होताच धावला. मात्र, दुसऱ्या टोकाला डेवॉन कॉनवे काहीसा गडबडला आणि त्यानंतर धावू लागला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत असलेला वेगवान गोलंदाज सीन अबॉट पहिल्यांदा चेंडू पकडू शकला नाही. त्याचवेळी फलंदाजी करत असलेले विल्यमसन व कॉनवे खेळपट्टीच्या मधोमध उभे होते. अखेरीस विल्यमसननेच पुन्हा एकदा उलटे फिरत स्ट्राईक एंडला धावण्याचा निर्णय घेतला.
Mayhem in the middle #AUSvNZ pic.twitter.com/FzBY9SuKHD
— cricket.com.au (@cricketcomau) September 8, 2022
तोपर्यंत आपली चूक सुधारत अबॉटने चेंडू यष्टिरक्षक ऍलेक्स केरीच्या दिशेने टाकला. केरीने चेंडू पकडला. मात्र, तो स्टंपजवळ असूनही, चेंडूला स्टंप्सवर मारू शकला नाही. त्याच दरम्यान विल्यमसन त्याच्या टोकाला पोहोचला. विल्यमसनला मात्र या जीवदानाचा फारसा फायदा उठवता आला नाही. तो अखेरीस 58 चेंडूत केवळ 17 धावा करून बाद झाला.
केर्न्स येथे झालेल्या मालिकेतील या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 195 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियासाठी स्मिथने अर्धशतक ठोकले. तर न्यूझीलंडसाठी ट्रेंट बोल्टने 4 बळी मिळवले. यानंतर धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ अपयशी ठरला. ऍडम झंपाच्या पाच बळींच्या जोरावर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी न्यूझीलंडचा डाव 82 धावांवर संपुष्टात आणला. अष्टपैलू कामगिरी करणारा मिचेल स्टार्क सामनावीर ठरला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
भारताला विश्वचषक जिंकण्यापूर्वी ऑस्ट्रेलिया अन् न्यूझीलंडला सामोरे जावे लागेल, वाचा T20WCचे सुधारित वेळापत्रक
पीएसएलच्या ‘फ्लॉप शो’ नंतर पाकिस्तानचा आणखी एक ‘पीजे’, पीसीबीने केली मोठी घोषणा
आशिया चषकात ‘या’ तीन चुका भारताला पडल्या महागात; जर टाळल्या तर टी-20 विश्वचषक आपलाच!





