वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना सध्या इंग्लंडमधील साऊथम्पटनच्या मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत रंगतदार खेळ पाहायला मिळाला. दोन्ही संघांनी दर्जेदार क्रिकेटचे नमुना पेश केला. मात्र यावेळी पहिल्या सत्रात चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली. न्यूझीलंडचा यष्टीरक्षक बीजे वॅटलिंगला एक चेंडू अडवताना गंभीर दुखापत झाली.
वॅटलिंगच्या बोटाला जबर दुखापत
सहाव्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली तेव्हा भारतीय संघ २ बाद ६४ अशा स्थितीत होता. त्यावेळी विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा खेळपट्टीवर होते. मात्र कायले जेमिसनने या दोघांनाही बाद करत भारताला मोठा धक्का दिला. यानंतर अजिंक्य रहाणे देखील ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर लेगसाईडला फटका मारण्याच्या नादात बाद झाला. यावेळी भारतीय संघ संकटात सापडला होता.
मात्र त्यावेळी रवींद्र जडेजाने रिषभ पंतसह भागीदारी विणायला सुरुवात केली. हे दोघे खेळत असतांना ५३व्या षटकांत जडेजाने नील वॅगनरच्या चेंडूवर मिड ऑफच्या दिशेने एक फटका खेळला आणि एक धाव चोरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मिड ऑफला उभ्या असलेल्या केन विलियम्सनने स्टंपवर नेम धरून चेंडू फेकला. तो अडवण्याचा नादात बीजे वॅटलिंगच्या उजव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली.
पाहा व्हिडिओ:
हा चेंडू लागल्यानंतर वॅटलिंगला चांगलीच वेदना झाल्याचे जाणवले. त्यामुळे न्यूझीलंडचे फिजिओ देखील तातडीने मैदानात आले. मात्र न्यूझीलंडसाठी चांगली बातमी म्हणजे तात्पुरत्या उपचारानंतर वॅटलिंगने मैदान न सोडता खेळ सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला.
विशेष बाब म्हणजे बीजे वॅटलिंगचा हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अखेरचा सामना आहे. त्याने मागील महिन्यातच या सामन्यानंतर निवृत्ती घेण्याची घोषणा केली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
सचिन ठरला २१ व्या शतकातील सर्वात महान कसोटी फलंदाज; ‘या’ दिग्गजाला मागे टाकत पटकावला मान
…अन् चाहत्यांचे सेलिब्रेशन क्षणात बदलले निराशेत, पाहा कॅमेरामनने टिपलेला भन्नाट व्हिडिओ






