पुणे। पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या तर्फे आयोजित सातव्या पीवायसी-ट्रूस्पेस करंडक बॅडमिंटन साखळी स्पर्धेत उपांत्य फेरीत ब्लेझिंग ग्रिफिन्स संघाने स्कॅवेंजर्स संघाचा 4-2 असा, तर अर्बन रेवन्स संघाने द ईगल्स संघाचा 4-2 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या बॅडमिंटन कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत पहिल्या उपांत्य फेरीच्या लढतीत ब्लेझिंग ग्रिफिन्स संघाने स्कॅवेंजर्स संघाचा 4-2 असा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. सामन्यात सिल्व्हर खुल्या दुहेरी गटात आकाश सुर्यवंशी व विनित रुकारी यांनी अभिजीत राजवाडे व अनिश रुकारी यांचा 21-15, 20-21, 21-14 असा पराभव करत सामन्यात पहिला विजय मिळवीला. वाईजमन गटात गिरिश करंबेळकर व प्रशांत वैद्य यांनी रमन जैन व विरल देसाई यांचा 21-19, 21-16 असा पराभव करत आघाडी घातली; सिल्व्हर मिश्र दुहेरी गटात तुषार मेंगळे व हर्षवर्धन आपटे यांनी अमोल दामले व शुभंकर मेनन यांचा 15-0,15-0 असा सहज पराभव संघाचा डाव भक्कम केला. सिल्व्हर खुल्या दुहेरी गटात आकाश कश्यप व चिन्मय चिरपुटकर यांनी मनिष शहा व तन्मय चितळे यांचा 15-9, 15-8 असा पराभव करत संघाला विजय मिळवून देत अंतिम फेरीत प्रवेश केला.
दुस-या उपांत्य फेरीच्या लढतीत अर्बन रेवन्स संघाने द ईगल्स संघाचा 4-2 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. गोल्ड खुल्या मिश्र दुहेरी गटात संग्राम पाटील व सारा नवरे यांनी आपल्या विजयी कामगिरीत सातत्य राखत आर्य देवधर व गौरी कुलकर्णी यांचा 21-13, 21-19 असा पराभव केला. वाईजमन गटात श्रीदत्त शानबाग व विवेक जोशी यांनी अविनाश दोशी व संजय फेरवानी यांचा 15-21,21-17, 21-20 असा पराभव करत सामन्यात आघाडी घेतली. सिल्व्हर मिश्र दुहेरी गटात गिरिश मुजुमदार व रोहित भालेराव यांनी विमल हंसराज व शिवकुमार जावडेकर यांचा 15-7, 15-9 असा पराभव करत संघाचा डाव भक्कम केला. सिल्व्हर खुल्या दुहेरी गटात देवेंद्र राठी व सुदर्शन बिहानी यांनी अयुष गुप्ता व पार्थ कोळकर यांचा 15-6, 15-8 असा पराभव करत संघाला विजय मिळवून दिला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल:
उपांत्य फेरी:
ब्लेझिंग ग्रिफिन्स वि.वि स्कॅवेंजर्स : 4-2
(गोल्ड खुला दुहेरी गट- जयदीप गोखले/राजश्री भावे पराभूत वि अमित देवधर/मकरंद चितळे 14-21, 8-21; सिल्व्हर खुला दुहेरी गट- आकाश सुर्यवंशी/विनित रुकारी वि.वि अभिजीत राजवाडे/अनिश रुकारी 21-15, 20-21, 21-14; गोल्ड खुला मिश्र दुहेरी गट- प्रथम पारेख/दिपा खरे पराभूत वि तन्मय चोभे/शताक्षी किनिकर 6-21,16-21; वाईजमन- गिरिश करंबेळकर/प्रशांत वैद्य वि.वि रमन जैन/विरल देसाई 21-19, 21-16; सिल्व्हर मिश्र दुहेरी गट-तुषार मेंगळे/हर्षवर्धन आपटे वि.वि अमोल दामले/शुभंकर मेनन 15-0,15-0; सिल्व्हर खुला दुहेरी गट- आकाश कश्यप/चिन्मय चिरपुटकर वि.वि मनिष शहा/तन्मय चितळे 15-9, 15-8)
अर्बन रेवन्स वि.वि द ईगल्स : 4-2
(गोल्ड खुला दुहेरी गट- अव्दैत जोशी/अजिंक्य मुठे पराभूत वि देवेंद्र चितळे/तेजस चितळे 10-21, 12-21; सिल्व्हर खुला दुहेरी गट- आनंद शहा/अनिकेत सहस्त्रबुध्दे पराभूत वि अनिरूध्द आपटे/चेतन वोरा 10-21, 16-21 ; गोल्ड खुला मिश्र दुहेरी गट- संग्राम पाटील/सारा नवरे वि.वि आर्य देवधर/गौरी कुलकर्णी 21-13, 21-19 ; वाईजमन- श्रीदत्त शानबाग/विवेक जोशी वि.वि अविनाश दोशी/संजय फेरवानी 15-21,21-17, 21-20; सिल्व्हर मिश्र दुहेरी गट- गिरिश मुजुमदार/रोहित भालेराव वि.वि विमल हंसराज/शिवकुमार जावडेकर 15-7, 15-9; सिल्व्हर खुला दुहेरी गट- देवेंद्र राठी/सुदर्शन बिहानी वि.वि अयुष गुप्ता/पार्थ कोळकर 15-6, 15-8)