आजपासून(26 सप्टेंबर) दक्षिण आफ्रिका संघाचा बीसीसीआयच्या अध्यक्षीय एकादश संघाविरुद्ध (Board Presidents XI vs South Africa) 3 दिवसीय सराव सामना सुरु होणार होता. मात्र व्हिजियानग्राम येथे होणाऱ्या या एकमेव सराव सामन्याच्या पहिल्याच दिवशी पावसाचा व्यत्यय आला आहे.
त्यामुळे पहिल्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला आहे. आज या सामन्यात पावसामुळे नाणेफेकही झालेली नाही.
या सामन्यात अध्यक्षीय एकादश संघाचे नेतृत्व भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा(Rohit Sharma) करणार आहे. तसेच या अध्यक्षीय एकादश संघात मयंक अगरवाल, प्रियांक पांचाल, अभिमन्यू इश्वरन, करुण नायर, सिद्धेश लाड यांचा समावेश आहे.
तसेच केएस भरत यष्टीरक्षक आहे. तर गोलंदाजांच्या फळीत जलज सक्सेना, धर्मेंद्रसिंग जडेजा हे फिरकीपटू तर आवेश खान, इशान पोरेल, शार्दूल ठाकूर, उमेश यादव या वेगवान गोलंदाजांचा समावेश आहे.
या सराव सामन्यानंतर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका(India vs South Africa) संघात 3 सामन्यांची कसोटी मालिका 2 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे.
दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या 3 दिवसीय सराव सामन्यासाठी असा आहे बीसीसीआयचा अध्यक्षीय एकादश संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), मयंक अगरवाल, प्रियांक पांचाल, अभिमन्यू इश्वरन, करुण नायर, सिद्धेश लाड, केएस भारत (यष्टीरक्षक), जलज सक्सेना, धर्मेंद्रसिंग जडेजा, आवेश खान, ईशान पोरेल, शार्दुल ठाकूर, उमेश यादव.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–मैदानाच्या बाहेरही धोनीच स्टार, या खास यादीत आहे मोदींनंतर दुसऱ्या क्रमांकावर
–टी२० क्रमवारी: कोहली, शिखर नाही तर हिटमॅन रोहित शर्मासह केवळ हा भारतीय आहे टॉप १०मध्ये
–मुलाखत: ऑलिंपिक मेडल एकदिवस नक्कीच जिंकणार – राहुल आवारे