इंडियन प्रीमियर लीग या जगप्रसिद्ध स्पर्धेत खेळण्याचे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते. केवळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूच नव्हे, तर देशांतर्गत क्रिकेटमधील खेळाडूंनाही या स्पर्धेत संधी मिळते. त्यामुळे युवा आणि नवोदित खेळाडूंसाठी ही स्पर्धा उत्तम मंच आहे. मात्र, ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे माजी कर्णधार ऍलन बॉर्डर यांचं या स्पर्धेविषयी वेगळंच मत आहे.
जागतिक टी20 स्पर्धेला द्यावे प्राधान्य
ऍलन बॉर्डर यांचा असा विश्वास आहे की खेळाडू पैसे मिळतात म्हणून जागतील टी20 स्पर्धेला प्राधान्य न देता आयपीएलला प्राधान्य देतात. बॉर्डर म्हणाले की, “स्थानिक खेळापेक्षा जागतिक खेळाला प्राधान्य दिले पाहिजे. जर आपण जागतिक स्तरावरील टी20 स्पर्धेला प्राधान्य दिले नाही, तर आयपीएल स्पर्धेला यश येईल असं मला वाटत नाही. फक्त पैसे मिळतात म्हणून खेळाडू आयपीएलला प्राधान्य देतात. बरोबर ना?”
…तर क्रिकेट बोर्डाने खेळाडूंना आयपीएलमध्ये भाग घेण्यापासून थांबवावे
“जागतिक टी20 स्पर्धेला निश्चितच प्राधान्य दिले पाहिजे. जर खेळाडू असे करत नसतील, तर त्या देशातील क्रिकेट बोर्डाने त्यांना आयपीएलमध्ये भाग घेण्यापासून थांबवावे, ”असेही पुढे बोलताना ते म्हणाले.
कोहली कसोटी क्रिकेटला पुढे घेऊन जाणारा खेळाडू
ऍलन बॉर्डर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचे प्रशंसक आहेत. त्यांचा असा विश्वास आहे की विराट कसोटी क्रिकेटला पुढे घेऊन जाणारा खेळाडू आहे. याबद्दल बॉर्डर म्हणाले की, “कोहलीसारखे खेळाडू कसोटीचा प्रचार करू शकतात. लीग स्पर्धा आयोजित करण्याव्यरिक्त कसोटी क्रिकेटचा प्रचार करणे भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशावर अवलंबून असेल.”
…तर विराटाचे बाळ ऑस्ट्रेलियन असल्याचा दावा केला असता
विराट कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना खेळून भारतात परतणार आहे. त्याने पालकत्व रजा घेतली आहे. त्याच्या घरी लवकरच पाळणा हलणार आहे. याबद्दल बोलताना बॉर्डर गमतीने म्हणाले की, “आम्हाला आशा होती की विराटच्या बाळाचा जन्म ऑस्ट्रेलियामध्ये होईल, जेणेकरून आम्ही त्याचे बाळ ऑस्ट्रेलियन असल्याचा दावा करू शकू.”
ऑस्ट्रेलिया संघाचं पारडं असेल जड
“विराट कोहली पहिला कसोटी सामना खेळून भारतात परतणार आहे त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाचं पारडं जड असेल. मला वाटते की भारतासाठी हा मोठा धक्का आहे. फलंदाज आणि कर्णधार म्हणून विराटची जागा कोणीच घेऊ शकत नाही. ऑस्ट्रेलिया 2-1 अशी आघाडी घेऊ शकेल.”
महत्त्वाच्या बातम्या –
रैनासाठी ३४ वा वाढदिवस ठरणार खास; करणार ‘हे’ विशेष काम
ऑस्ट्रेलियन दिग्गजाचे रोहितविषयी वादग्रस्त वक्तव्य; ‘हिटमॅन’चे चाहते नाराज
‘गावसकरांनी आपल्या मुलाला तीन महिने पाहिले नव्हते,’ विराटच्या पालकत्व रजेवर दिग्गजाची प्रतिक्रिया
ट्रेंडिंग लेख –
वडिलांचं निधन झाल्यावरही देशासाठी मैदानावर लढलेले ३ भारतीय क्रिकेटर
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ३ दिग्गज कर्णधार, ज्यांच आयपीएल कर्णधारपद मात्र धोक्यात