---Advertisement---

आयपीएल २०२२च्या थरारक अंतिम सामन्यात ‘हा’ अभिनेता करणार कॉमेंट्री, क्रिकेटप्रेमींची उत्सुकता शिगेला

On: रविवार, मे 29, 2022 3:30 PM
GTvsRR
---Advertisement---

मुंबई प्रख्यात अभिनेता आमिर खानचे क्रिकेटप्रेम सगळ्यांनाच माहित आहे. ऑस्करपर्यंत पोहोचलेला सिनेमा ‘लगान’मध्ये आमिरने साकारलेली भुवन ही व्यक्तिरेखा आजही चाहत्यांच्या स्मरणात आहे. आता तर आमिरचं क्रिकेटप्रेम एका वेगळ्याच उंचीवर पोहोचलं आहे. आमिर खान रविवारी (दि. 29  मे) नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये इंडियन प्रीमियर लीग 2022च्या (IPL 2022) अंतिम सामन्यात समालोचन करण्यासाठी पूर्णत: तयार आहे. याच निमित्ताने आमिर आपला आगामी सिनेमा ‘लाल सिंग चड्ढा’चा बहुप्रतीक्षित प्रदर्शित करणार आहे.

आमिरसोबत काही माजी क्रिकेटपटूही सहभागी होतील. हे खेळाडू आईपीएल 2022च्या दरम्यान समालोचनाच्या स्टुडियोमध्ये दिसण्याचीही शक्यता आहे.

आमिर खानचे समालोचन करतानाचे पोस्टर ‘कू’वर (Koo App) ट्रेंड (#IPLFinalswithAamirkhan) करते आहे. ज्यात आयपीएल फायनलसोबत प्रेक्षक आमिर खान समालोचन करणार म्हणून क्रिकेट आणि सिनेरसिक अत्यंत उत्साही आहेत.

लाल सिंग चड्ढाचा ट्रेलर 29 मे रोजी टी20 क्रिकेटच्या अंतिम सामन्यात लाँच केले जाईल. या सगळ्या सोहळ्याचे प्रसारण स्टार स्पोर्ट्स (Star sports)वर होईल.

ट्रेलर रिलीज अंतिम सामन्याच्या पहिल्या इनिंगच्या सेकंड टाईम आऊटच्या दरम्यान होऊ शकतो. 29 मे रोजी आईपीएल 2022चा अंतिम सामना रात्री 8 वाजता सुरू होईल. हा सामना गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्या दरम्यान होणार आहे. लाल सिंग चड्ढाचा ट्रेलर पहिल्या डावाच्या नवव्या ते पंधराव्या षटकाच्या दरम्यान म्हणजेच रात्री 9:00 ते 9:30 च्या दरम्यान प्रदर्शित होऊ शकतो.

आमिर खानच्या लाल सिंग चड्ढामध्ये करीना कपूर आणि मोना सिंग यांच्याही मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट टॉम हँक्सच्या अभिनयाने सजलेला चित्रपट ‘फॉरेस्ट गंप’चा (Forrest Gump) हिंदी रिमेक आहे. हा चित्रपट बघण्यासाठी चाहते अगदीच आतुर झालेले आहेत.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

IPL Final | विजेत्या-उपविजेत्या संघावरच नाही, तर पुरस्कार विजेत्या खेळाडूंवरही पडणार पैशांचा पाऊस

वय सोडा, कामगिरी पाहा! आयपीएलमध्ये ‘असा’ कारनामा फक्त धोनी अन् कार्तिकलाच जमलाय, टाका एक नजर

पंड्या अन् सॅमसनआधी ‘या’ भारतीय कर्णधारांनी खेळलीय आयपीएलची फायनल, जाणून घ्या एका क्लिकवर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---