---Advertisement---

बॉलिवूड अभिनेत्रीची श्रेयस अय्यरला खास ‘ऑफर’, म्हणाली, ‘माझ्यासोबत कॉफी पिला असता, तर…’

Ashweenee-Aher-And-Shreyas-Iyer
---Advertisement---

भारतीय संघाचा सूर्यकुमार यादव सध्या मैदानात आपल्या फलंदाजीचा दम दाखवताना दिसत आहे. नवीन ‘मिस्टर 360’ म्हणून ओळख बनवत असलेला सूर्या गोलंदाजांना घाम फोडताना दिसत आहे. रविवारी (दि. 20 नोव्हेंबर) न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात त्याने नाबाद वादळी शतक झळकावले. त्याच्या फलंदाजीने सर्वांनाच वेड लावले आहे. कदाचित प्रत्येक फलंदाजाला त्याच्यासारखी फलंदाजी करण्याची इच्छा होत असावी. अशात एक अभिनेत्री आणि मॉडेलने भारतीय खेळाडू श्रेयस अय्यर याला ऑफर दिली की, तिच्यासोबत कॉफी पिल्यानंतर तोदेखील सूर्याप्रमाणे शतक मारू शकतो. याचीच चर्चा सर्वत्र सुरू आहे.

श्रेयस अय्यरला मिळाली खास ऑफर
भारतीय संघाचा धडाकेबाज फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याला एक खास ऑफर मिळाली. त्याला एका बॉलिवूड अभिनेत्री- मॉडेलने ऑफर दिली आहे की, जर तो तिच्यासोबत कॉफी पिला, तर तोदेखील सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याच्यासारखे शतक झळकावू शकतो. श्रेयसला ही ऑफर देणाऱ्या अभिनेत्री- मॉडेलचे नाव अश्विनी अहेर (Ashweenee Aher) आहे. तिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये तिच्या हातात कॉफीचा मगही आहे. तसेच, तिने लिहिले आहे की, “श्रेयस सामन्यापूर्वी जर माझ्यासोबत कॉफी पिला, तर तोदेखील सूर्यकुमार यादवसारखा शतक मारू शकतो.”

Ashweenee-Aher
Photo Courtesy: Instagram/ashweenee_official

हिट विकेट झाल्यावर साधला निशाणा
विशेष म्हणजे, यावेळी तिने श्रेयस अय्यरला टॅगही केले होते. श्रेयसच्या चाहत्यांचे लक्षही या गोष्टीने वेधले. त्यानंतर सोशल मीडियावर अनेक लोकांनी याचे स्क्रीनशॉट्स शेअर केले. खरं तर, न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात सूर्यकुमार यादव याने 111 धावांची नाबाद खेळी खेळली होती. मात्र, या सामन्यात श्रेयसला 9 चेंडूत एक चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने 13 धावा करता आल्या होत्या. यावेळी तो हिट विकेट होऊन तंबूत परतला होता. बाद झाल्यानंतर तो भलताच नाराज दिसला. त्यानंतर अश्विनीने तिचा फोटो शेअर करत श्रेयसवर निशाणा साधला.

सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर या सामन्यात भारताने 6 विकेट्स गमावत 191 धावा चोपल्या होत्या. हे आव्हान पार करताना न्यूझीलंड संघ 18.5 षटकात 126 धावांवर सर्वबाद झाला. न्यूझीलंडकडून कर्णधार केन विलियम्सन याने 61 धावांची खेळी केली. भारताकडून यावेळी दीपक हुड्डा याने 4 विकेट्स घेतल्या. आता भारत या मालिकेत 1-0ने आघाडीवर आहे. (bollywood actress ashweenee aher on shreyas iyer and suryakumar yadav)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘मी गुन्हेगार नाहीये…’, चेंडूशी छेडछाड प्रकरणात अडकलेल्या दिग्गज ऑस्ट्रेलियन खेळाडूचे मोठे वक्तव्य
क्रिकेटच्या मैदानात वादळी खेळी करणारा सूर्यकुमार अभ्यासात हिरो की झिरो? घ्या जाणून

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---