क्रिकेटजगताला आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेचे वेध लागले आहेत. ही स्पर्धा भारतात खेळली जाणार आहे. स्पर्धा ऑक्टोबर महिन्यात सुरू होणार असून नोव्हेंबरमध्ये संपणार आहे. 5 ऑक्टोबर रोजी पहिला, तर 19 नोव्हेंबर रोजी स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. या स्पर्धेसाठी जगभरातील क्रिकेटप्रेमी खूपच उत्सुक आहेत. अशातच बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला पॅरिसमध्ये विश्वचषकाच्या ट्रॉफीसोबत उभी राहून पोझ देताना दिसली आहे. यादरम्यानचा फोटोही तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो आता वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे.
अभिनेत्रीने शेअर केला फोटो
बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Bollywood Actress Urvashi Rautela) हिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत उर्वशी रौतेला आयसीसी ट्रॉफीसोबत (Urvashi Rautela ICC Trophy) दिसत आहे. हा फोटो फ्रान्सची राजधानी पॅरिसचा आहे. ट्रॉफीच्या मागे आयफेल टॉवर (Eiffel Tower) दिसत आहे. अशाप्रकारे उर्वशी अधिकृतरीत्या विश्वचषक ट्रॉफीचे अनावरण करणारी भारताची पहिली कलाकार बनली आहे. यादरम्यान तिने सोनेरी रंगाचा ड्रेस परिधान केला होता.
हा फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “फ्रान्सच्या पॅरिसमधील आयफेल टॉवरजवळ अधिकृतरीत्या क्रिकेट विश्वचषक 2023 ट्रॉफी लाँच आणि अनावरण करणारी पहिली कलाकार.”
https://www.instagram.com/p/CwR-frNhN9w/?utm_source=ig_embed&ig_rid=7361344b-2af6-45ae-8e33-42b5d322627d
यासोबतच अभिनेत्रीने आयसीसी आणि फ्रान्स क्रिकेटलाही धन्यवाद दिला आहे. या पोस्टवर चाहते तिला शुभेच्छाही देताना दिसत आहेत.
विश्वचषकाविषयी थोडक्यात
विश्वचषक 2023 स्पर्धेतील पहिला सामना गतविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड संघात खेळला जाणार आहे. 5 ऑक्टोबर रोजी दोन्ही संघ अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये एकमेकांचा सामना करतील. भारतीय संघ स्पर्धेतील आपले अभियान 8 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याने करेल. हा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडिअममध्ये खेळला जाणार आहे. यजमान संघ असल्यामुळे भारतीय संघाकडे ट्रॉफी जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. (bollywood actress urvashi rautela becomes first actor to unveil icc cricket world cup 2023 trophy in france)
हेही वाचा-
पाकिस्तानविरुद्ध 151 धावांचा पाऊस पाडत अफगाणी पठ्ठ्याने रचला विक्रम, ‘एवढ्या’ कमी डावात ठोकली 5 शतके
पाकिस्तानी खेळाडूने चहलविषयी ओकली गरळ, वाचून 140 कोटी भारतीयांच्या तळपायाची आग जाईल मस्तकात