---Advertisement---

पाकिस्तानविरुद्ध 151 धावांचा पाऊस पाडत अफगाणी पठ्ठ्याने रचला विक्रम, ‘एवढ्या’ कमी डावात ठोकली 5 शतके

Rahmanullah-Gurbaz
---Advertisement---

अफगाणिस्तान संघाचा युवा सलामीवीर फलंदाज रहमानुल्लाह गुरबाज बॅटमधून आग ओकत आहे. अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान संघातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसरा सामना श्रीलंकेच्या हंबनटोटा येथे पार पडला. या सामन्यात गुरबाजने वादळी शतक ठोकत खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. विशेष म्हणजे, या विक्रमात त्याने पाकिस्तानी कर्णधार बाबर आझम यालाही पछाडले आहे.

गुरबाजचा विक्रम
रहमानुल्लाह गुरबाज (Rahmanullah Gurbaz) याने पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात अक्षरश: धावांचा पाऊस पाडला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या अफगाणिस्तान संघाकडून गुरबाजने 151 चेंडूत 151 धावांची झंझावाती दीडशतकी खेळी साकारली. यात 3 षटकार आणि 14 चौकारांचा समावेश होता. यामुळे त्याच्या नावावर खास विक्रम नोंदवला गेला. हे त्याच्या वनडे कारकीर्दीतील पाचवे शतक ठरले. या पाचव्या शतकासह गुरबाज वनडे क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान पहिली 5 शतके ठोकणारा तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज बनला आहे.

https://twitter.com/ICC/status/1694684333179589050

गुरबाजने कारकीर्दीतील पाचवे शतक ठोकत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) याचा विक्रमही मोडीत काढला आहे. चला तर, वनडेत सर्वात वेगवान सुरुवातीचे 5 शतक ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत कोण आहे जाणून घेऊयात…

या यादीत पहिल्या स्थानी संयुक्तरीत्या दक्षिण आफ्रिका संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक आणि आहे. त्याने पहिल्या 19 डावातच कारकीर्दीतील पहिली 5 शतके ठोकली होती. यानंतर यादीत दुसऱ्या स्थानी पाकिस्तानचा सलामीवीर इमाम उल हक आहे. त्यानेही 19 डावातच पहिली 5 शतके केली होती.

https://twitter.com/ACBofficials/status/1694696839943946498

यानंतर यादीत तिसऱ्या स्थानी रहमानुल्लाह गुरबाज याच्या नावाचा समावेश झाला आहे. त्याने पाकिस्तानविरुद्ध 23व्या डावात कारकीर्दीतील पाचवे शतक ठोकले. तसेच, चौथ्या स्थानी बाबर आझम याचे नाव आहे. त्याने पहिल्या 25 डावात पहिली 5 शतके केली होती.

या यादीत पाचव्या स्थानी श्रीलंकेचा माजी सलामीवीर उपल थरंगा आहे. त्याने 28 डावात हा पराक्रम गाजवला होता. तसेच, यादीत सहाव्या स्थानी भारतीय फलंदाज शिखर धवन आहे. त्यानेही 28 वनडे डावात पहिली 5 शतके केली होती. (record alert cricketer rahmanullah gurbaz becomes third fastest to score fifth odi century just 23 innings goes past babar azam)

हेही वाचा-
पाकिस्तानी खेळाडूने चहलविषयी ओकली गरळ, वाचून 140 कोटी भारतीयांच्या तळपायाची आग जाईल मस्तकात
‘मी घाबरलेलो अन् स्वत:ची लाज वाटली होती…’, गंभीरने अखेर ‘तो’ किस्सा सांगितलाच

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---