भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलचे नाव सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणले जाते. राहुलने अवघ्या काही महिन्यांमध्येच उत्कृष्ट कामगिरी करत करोडो चाहत्यांच्या मनात आपले स्थान जणू काही पक्केच केले आहे. त्याचा खेळ तर अप्रतिम आहेच, परंतु त्याची खेळण्याची शैलीदेखील तितकीच सुंदर आहे. कदाचित यामुळेदेखील राहुलवर लाखो मुली फिदा असतात, परंतु हा पठ्ठ्या मात्र बॉलिवूडच्या एका अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आहे. तसं पाहिलं तर भारतीय क्रिकट संघाचे खेळाडू आणि बॉलिवूड अभिनेत्रींमधील नात्यांच्या बातम्या नेहमीच ऐकायला मिळतात. मग अशामध्ये राहुल थोडीच मागे राहणार होता.
राहुलचे नाव सध्या बॉलिवूड सुपरस्टार आण्णा म्हणजेच सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टीबरोबर जोडले जात आहे. इतकेच नव्हे, तर माध्यमांमध्ये अशा बातम्या येत आहेत, की दोघे लवकरच साखरपुडा करणार आहेत. तसं पाहिलं तर राहुलचे नाव कोणत्याही अभिनेत्रीशी जोडण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही त्याचे नाव अनेक हसीनांबरोबर जोडले गेले आहे.
चला तर मग जाणून घेऊया या राहुलच्या अफेअर्सबद्दल, जे खूप कमी चाहत्यांना माहित आहेत.
अथिया शेट्टी
सध्या जर माध्यमांमध्ये कोणत्या जोडीचे नाव चर्चेत असेल, तर ते म्हणजे यष्टीरक्षक केएल राहुल आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) या जोडीचे. सध्या राहुल अथियाला डेट करत आहेत. त्याने अनेकवेळा अथियाबरोबरचे आपले अनेक फोटो सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले आहेत. दोघांचीही जोडी चाहत्यांच्या पसंतीस येत आहे. इतकेच नव्हे तर सध्या चाहते त्या दोघांच्याही लग्नाच्या बाबतीत उत्सुक असल्याचे दिसत आहेत. चाहते नेहमीच राहुलशी याबाबतीत प्रश्न विचारत असतात की तो आणि अथिया साखरपुडा केव्हा करणार आहेत.
माध्यमांतील काही वृत्तांनुसार, अथियाचे वडील म्हणजेच सुनील शेट्टी आणि तिची आईदेखील राहुलला पसंत करतात. आता हे पहावे लागेल, की राहुल आणि अथिया आपल्या चाहत्यांना खुशखबर केव्हा देतात.
आकांक्षा रंजन
अथिया शेट्टीपूर्वी राहुलचे नाव बॉलिवूड अभिनेत्री आकांक्षा रंजनबरोबरही (Akansha Ranjan) जोडले गेले आहे. आकांक्षाने ‘वेडिंग पुलाव’ आणि ‘बत्ती गुल मीटर चालू’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तरीही हे चित्रपट फारसे चाहत्यांच्या पसंतीस आले नाहीत. जेव्हा तिचे नाव राहुलशी जोडले गेले, तेव्हा ती चर्चेत येऊ लागली. इतकेच नव्हे तर नवीन वर्षाची सुरुवात त्याने अथिया आणि आकांक्षा या दोघींबरोबर थायलंडमध्ये केली होती. या दोघींव्यतिरिक्त राहुलचे नाव जन्नत गर्ल सोनल चौहानबरोबरही जोडले गेले आहे. परंतु सोनलने आपल्या एका मुलाखतीदरम्यान आपले आणि राहुलचे अफेअर असल्याचे वृत्त पूर्णपणे चूकीचे असल्याचे सांगितले होते.
निधी अगरवाल
सोनल चौहाननंतर राहुलचे नाव टायगर श्रॉफबरोबर चित्रपटात काम करणारी अभिनेत्री निधी अगरवालसोबतही (Niddhi Agerwal) जोडले गेले आहे. दोघेही मुंबईच्या एका कॅफेमध्ये सोबत दिसले होते. त्यानंतर राहुल आणि निधीच्या अफेअरच्या चर्चांना उधान आले होते. तरीही राहुल आणि निधी दोघांनाही आपल्या अफेअरच्या बातम्यांना नकार दिला आणि आपण केवळ एक चांगले मित्र असल्याचे त्यांनी सांगितले.
सोनम बाजवा
पंजाबच्या चित्रपटांमधील प्रसिद्ध अभिनेत्री सोनम बाजवा (Sonam Bajwa) हिच्याबरोबरही राहुलचे नाव जोडलेले पहायला मिळते. दोघांनीही सोशल मीडियामार्फत एकमेकांशी चॅटिंग करण्यास सुरुवात केली होती. सोनमने आपल्या एका पोस्टमध्ये लिहिले होते, की ‘सूर्यास्तावेळी मी तुझ्याबद्दल विचार करत आहे,’ यावर प्रत्युत्तर देत राहुलने लिहिले होते, की ‘रात्री भेटूया,’ या पोस्टमुळे त्यांच्या अफेअरच्या बातम्यांना उधान आले होते. परंतु या दोघांच्याही अफेअरची बातमी लवकरच सोशल मीडियावर येणे बंद झाली होती.
वाचनीय लेख-
-एका छोट्याश्या खिळ्याने घेतला होता प्रतिभावान क्रिकेटपटूचा जीव
-१६व्या वर्षी कसोटी पदार्पण करत जबरदस्त करियर केलेले ३ क्रिकेटर
-शेवटच्या वनडेत शतक करुन क्रिकेटला अलविदा करणारे ५ धुरंदर, पहा किती आहे भारतीय