fbpx
Sunday, April 11, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत दुहेरीत रोहन बोपन्नाला वाईल्ड कार्ड प्रदान

January 31, 2020
in टेनिस, टॉप बातम्या
0

पुणे। टाटा ओपन टेनिस स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वातील स्पर्धेसाठी भारताचा दिग्गज टेनिसपटू रोहन बोपन्ना आणि त्याचा साथीदार अर्जुन कढे यांना दुहेरीत वाईल्ड कार्डद्वारे थेट प्रवेश देण्यात आला आहे. ही म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील टेनिस कोर्टवर ३ ते ९ फेब्रुवारी दरम्यान ही स्पर्धा पार पडणार आहे.

स्पर्धेची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. या वेळी पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रवण हर्डीकर, क्रीडा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया, महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेचे सचिव सुंदर अय्यर आणि टाटा ओपन टेनिस स्पर्धेचे स्पर्धा संचालक प्रशांत सुतार उपस्थित होते.

गतवर्षीच्या मालिकेत जागतीक क्रमांक 38 असलेल्या रोहन बापन्ना याने दिविज शरणच्या साथीत दुहेरीचे विजेतेपद पटकावले होते. तसेच यावर्षी देखील दक्षिण आशियातील एटीपी टुर्स स्पर्धांपैकी एक असलेल्या या स्पर्धेत रोहन बोपन्ना पुण्याच्या अर्जुन कढेच्या साथीत खेळणार आहे. दिवीज शरण आर्टेम सिटॅक या जोडीला मुख्य ड्रॉमध्ये थेट प्रवेश देण्यात आला आहे. याशीवाय अर्जून कढेला एकेरीत आणि भारताचा उदयोन्मुख खेळाडू शशिकुमार मुकुंद याला वाईल्ड कार्ड प्रदान करण्यात आले.

या स्पर्धेचे संचालक प्रशांत सुतार म्हणाले की, रोहन बोपन्ना याचे या स्पर्धेतील होणारे आगमन ही आनंदाची बाब आहे. गतवर्षीच्या मालिकेत त्याने दुहेरीचे विजेतेपद पटकावले होते. याहीवर्षी तो अर्जुन कढेच्या साथीत लक्षवेधी कामगिरी करेल अशी आशा आहे.

अर्जून कढे आणि शशिकुमार मुकुंद यांसह पाच भारतीय खेळाडू 28च्या एकेरीच्या मुख्य ड्रॉमध्ये सहभागी होणार आसून एकूण १९ टेनिसपटूंना मुख्य फेरीत थेट प्रवेश देण्यात आला आहे. यापूर्वी स्पर्धेसाठी भारताच्या प्रज्ञेश गुणेश्वरन, सुमित नागल, रामकुमार रामनाथन या तीन भारतीय खेळाडूंचा मुख्य फेरीत स्थान मिळाले आहे. देशातील अव्वल स्थानावर असणारा प्रज्ञेश आणि दुसऱ्या स्थानावरील सुमित यांना मुख्य फेरी थेट प्रवेश देण्यात आला आहे. स्पर्धेत देण्यात येणाऱ्या तीन पैकी पहिला वाईल्ड कार्ड प्रवेश रामकुमार याला देण्यात आला आहे.

प्रशांत सुतार पुढे म्हणाले की, यावर्षी पहिल्यांदाच अनेक भारतीय टेनिसपटूंना मुख्य ड्रॉमध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे भारतात ही एटीपी टुर स्पर्धा आयोजीत करून या स्पर्धेच्या माध्यमातून भारतीय खेळाडूंना एक उच्च स्थरावारील स्पर्धा खेळण्याची संधी मिळेलच याखेरीज महत्वपुर्ण गुण देखील संधी मिळणार असल्याचे त्यांनी नमुद केले. तसेच भारताचा साकेत मायनेनी व फ्रेंच ओपन स्पर्धेतील उपांत्यफेरी पर्यंत मजल मारणारा गुलबीस यांना एकेरीच्या पात्रता फेरीसाठी वाईल्डकार्ड देण्यात आले असल्याचे त्यांनी नमुद केले.

जगभरातील नामवंत टेनिसपटू भारतातील या महत्वाच्या २५० इव्हेंटमधील स्पर्धेचे विजेतेपद मिळविण्यासाठी आपले कौशल्य पणाला लावणार आहेत. या स्पर्धेत एकूण ५४६,३५५ अमेरिकन डॉलरची रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धेच्या इतिहासातील ही सर्वाधिक पारितोषिक रक्कम आहे. स्पर्धेच्या मुख्य फेरीस ३ फेब्रुवारीस सुरवात होईल. स्पर्धेतील पात्रता फेरीच्या लढती १ आणि २ फेब्रुवारीस खेळविल्या जातील.

महाराष्ट्र राज्य टेनिस संघटनेचे सचिव सुंदर अय्यर म्हणाले की. यार्षीपासून आम्ही शॉट क्लॉक ही संकल्पना राबविणार असल्याचे दोन गुणांच्यामध्ये या पद्धतीने २५ सेकंद मोजली जाणार आहेत. सर्वप्रथम २००७ मधील एटीपी फायनल्स स्पर्धेत याचा वापर करण्यात आला होता. त्यानंतर २०१८ मधील अमेरिकन टेनिस स्पर्धेतही याचा वापर झाला होता.

स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी मिळाल्याचा आनंद व्यक्त करताना क्रीडा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया म्हणाले,या तिसऱ्या पर्वात खेळाडूंना सर्वोत्तम सुविधा देण्यात येतील. तसेच, कोर्टवर एलईडी बॅक़्रॉप बसविण्यात आल्यामुळे प्रेक्षकांनाही लढतींचा आनंद अधिक सहज घेता येईल. एकूणच या स्पर्धेने खेळाडू आणि प्रेक्षकांना एक वेगळा अनुभव मिळेल.टाटा ओपन महाराष्ट्र सारख्या जागितक दर्जाच्या स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी मिळाली हे पुण्याचे भाग्यच आहे.

या स्पर्धेत अनेक जागितक दर्जाचे टेनिसपटू सहभागी होणार आहेत. सहाजिकच प्रेक्षकांना या स्पर्धेच्या निमित्ताने दर्जेदार टेनिसचा आनंद घेता येणार आहे. पुण्याला एक क्रीडा संस्कृती आहे. पुण्यात आतापर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूही पुण्याने दिले आहेत. पुणेकर क्रीडा प्रेमी आहेत आणि याचा अनुभव या स्पर्धेतही दिसून येईल, असेही ते म्हणाले. स्पर्धेच्या पात्रता फेरीचे सामने 1 व 2 फेब्रुवारी या कालावधीत होणार असल्याचे हार्डीकर यांनी सांगितले.

स्पर्धेची तिकिटे http://www.zoonga.com/tata-open या अधिकृत संकेत स्थळावर उपलब्ध आहेत.


Previous Post

…म्हणून सुपर ओव्हरमध्ये केएल राहुलसह विराट कोहली आला फलंदाजीला

Next Post

आर्या, श्रावणी, सानिका, रुमानी उपांत्यपूर्व फेरीत

Related Posts

Photo Courtesy: Twitter/@DelhiCapitals
IPL

बलाढ्य चेन्नईवर मात करण्यात ‘या’ खेळाडूंनी उचलला खारीचा वाटा; पाहा दिल्लीच्या विजयाचे नायक

April 11, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

‘भारतात अफाट प्रतिभा, ते एक युग क्रिकेटविश्वावर राज्य करु शकतात,’ दिल्लीकरांच्या फलंदाजीवर इंग्लिश दिग्गज फिदा

April 11, 2021
Photo Courtesy: Twitter/ICC
क्रिकेट

जबरदस्त! अवघ्या १४ धावा करुनही आझमची ट्वेंटी ट्वेंटीतील मोठ्या विक्रमाला गवसणी, ठरला पहिलाच

April 11, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

पराभवाचं दुख अन् त्यात शिक्षा! ‘या’ कारणामुळे एमएस धोनीला तब्बल १२ लाखांचा झाला दंड

April 11, 2021
Photo Courtesy: Twitter/@ChennaiIPL
IPL

DC च्या हातून CSK चारीमुंड्या चित, कॅप्टन धोनीने ‘यांच्या’वर फोडले पराभवाचे खापर

April 11, 2021
Photo Courtesy: Twitter/ChennaiIPL
IPL

‘या’ संघाविरुद्ध चेन्नई नेहमीच गंडते; पाहा चेन्नईला सर्वाधिकवेळा पराभूत करणारे संघ

April 11, 2021
Next Post

आर्या, श्रावणी, सानिका, रुमानी उपांत्यपूर्व फेरीत

११ वी खुली बुद्धीबळ स्पर्धेत अनिरुद्ध देशपांडेने पटकावले विजेतेपद

प्रिमियर बॅडमिंटन लीगच्या दुसऱ्या डबल हेडरमध्ये पुणे सेव्हन एसेसचा प्रयत्न विजयी फिर कायम ठेवण्याचा

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.