मॅचेस्टर। आज 2019 विश्वचषकातील 29 वा सामना न्यूझीलंड विरुद्ध विंडीज संघात सुरु आहे. या सामन्यात विंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
विंडीजचा कर्णधार जेसन होल्डरने घेतलेल्या या निर्णयाला योग्य ठरवत शेल्डन कॉट्रेलने पहिल्याच षटकात न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टील आणि कॉलिन मुनरो यांना शून्य धावेवर बाद केले आहे. विशेष म्हणजे हे दोघेही या सामन्यातील त्यांचा पहिलाच चेंडू खेळताना बाद झाले आहेत.
कॉट्रेलने गप्टिलला पहिल्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर पायचित बाद केले. तर याच षटकाच्या पाचव्या चेंडूवर मुनरोला कॉट्रेलने त्रिफळाचीत केले.
यामुळे वनडे क्रिकेटमध्ये एकाच डावात दोन्ही सलामीवीर फलंदाज त्यांचा पहिलाच चेंडू खेळताना म्हणजेच गोल्डन डकवर बाद होण्याची ही तिसरीच वेळ आहे.
याआधी 7 मे 2006 ला विंडीज विरुद्ध झिम्बाब्वे संघात झालेल्या सामन्यात पीटर रिंक आणि टेरी डफिन हे झिम्बाब्वेचे सलामीवीर त्यांचा पहिलाच चेंडू खेळताना फिडेल एडवर्ड्सच्या गोलंदाजीवर बाद झाले होते.
त्यानंतर 2015 च्या विश्वचषकात 22 फेब्रुवारीला झालेल्या श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान संघातील सामन्यात श्रीलंकेचे लहिरू थिरिमन्ने आणि तिलकरत्ने दिलशान हे सलामीवीर फलंदाज त्यांचा सामन्यातील पहिलाच चेंडूू खेळताना शुन्य धावेवर बाद झाले होते.
आज सुरु असलेल्या न्यूझीलंड विरुद्ध विंडीज सामन्यात न्यूझीलंडकडून पहिल्या दोन विकेट्स लवकर गमावल्यानंतर कर्णधार केन विलियम्सन आणि रॉस टेलरने डाव सांभाळताना तिसऱ्या विकेटसाठी नाबाद अर्धशतकी भागीदारी केली आहे.
0.1 – Wicket
0.2 – 4️⃣
0.3 – 0️⃣
0.4 – 3️⃣
0.5 – Wicket
0.6 – 3️⃣Relive that brilliant first over from Sheldon Cottrell on our app!
APPLE 🍎 https://t.co/whJQyCahHr
ANDROID 🤖 https://t.co/Lsp1fBwBKR#MenInMaroon | #CWC19 | #BackTheBlackCaps pic.twitter.com/6oecO1iAaM— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) June 22, 2019
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–एमएस धोनीच्या बाबतीत केवळ दुसऱ्यांदाच घडली अशी गोष्ट
–इंग्लंडमध्ये सचिन-द्रविड नंतर विराट कोहलीनेही केला तो खास विक्रम
–रोहितची विकेट नडली! भारताविरुद्ध झाला तो विक्रम