सन २०१९ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत इंग्लंड संघाचा पराभव करणारा न्यूझीलंड संघ आज हिशोब चुकता करण्यासाठी उतरणार आहे. टी२० विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य फेरीत न्यूझीलंड संघ केवळ वचपा काढण्याचे लक्ष्य ठेवणार नाही, तर अंतिम फेरीत पोहचण्याचा प्रयत्न देखील करणार आहे.
विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेला इंग्लंड संघ खेळाडूंच्या दुखापतींशी झुंज देत आहे. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सुपर-१२ च्या शेवटच्या सामन्यात इंग्लडचा पराभव झाला आहे. त्यामुळे इंग्लड संघ अजिंक्य नसल्याचे सिद्ध झाले आहे.
दरम्यान, इंग्लंड आणि न्यूझीलंड संघात बुधवारी (१० नोव्हेंबर) होणाऱ्या टी२० विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात कोणते ५ खेळाडू मुख्य भूमिका निभावू शकतात यावर नजर टाकू.
केन विलियम्सन
न्यूझीलंडच्या फलंदाजांनीही आतापर्यंत स्पर्धेत चांगला प्रभाव पाडला आहे. सलामीवीर मार्टिन गप्टिलने न्यूझीलंड संघासाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत, तर त्याचा साथीदार डॅरिल मिशेल चांगलाच फॉर्मात आहे. कर्णधार केन विलियम्सन हा त्यांचा भरवशाचा फलंदाज आहे आणि तो संघाचा कणा आहे. उपांत्य फेरीतही तो महत्त्वपूर्ण योगदान देण्याचा त्याचा प्रयत्न असेल. न्यूझीलंड कर्णधार मधल्या षटकांमध्ये खेळपट्टीवर मजबूत उभा राहुन चांगल्या धावा करू शकतो.
जॉस बटलर
जॉस बटलर आक्रमक फलंदाज आहे. या टी२० विश्वचषकात तो एका वेगळ्याच रंगात दिसत आहे. या यष्टीरक्षक फलंदाजाने या स्पर्धेत शतकही ठोकले आहे. अशी कामगिरी करणारा तो इंग्लंडचा पहिला खेळाडू ठरला. तो या स्पर्धेत पाकिस्तानच्या बाबर आझमनंतर सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू आहे. बटलरच्या टी२० विश्वचषक स्पर्धेत २४० धावा झाल्या आहेत. जॉस बटलर न्यूझीलंडविरुद्ध याच लयीत दिसला, तर इंग्लंडचा विजय झाला सोपा होईल.
ट्रेंट बोल्ट
सध्या जगातील सर्वात धोकादायक डावखुरा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट आहे. खेळाच्या तिन्ही प्रकारामध्ये त्याचा चांगला फॉर्म आहे. सध्याच्या विश्वचषकातही तो चांगल्या लयीत आहे. पॉवरप्लेमध्ये विकेट घेण्याची क्षमता हा न्यूझीलंडसाठी प्लस पॉइंट आहे. पहिल्या सहा षटकात जर एकही विकेट पडली नाही तर इंग्लंड संघ भाग्यवान ठरेल. सध्याच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत ११ विकेट्ससह बोल्ट हा तिसरा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे.
मोईन अली
जोफ्रा आर्चर आणि सॅम करन यांच्या अनुपस्थितीत मोईन अली इंग्लंडसाठी खूप प्रभावी ठरला आहे. कर्णधार मॉर्गन त्याचा चांगला वापर करताना दिसला, विशेषतः पॉवरप्लेमध्ये. मोईन अली फलंदाजीतही अप्रतिम कामगिरी केली आहे. मोईन अलीने स्पर्धेमध्ये सात विकेट घेतल्या आहेत.
ईश सोढी
टी२० विश्वचषकात ईश सोढी न्यूझीलंडसाठी ट्रम्प कार्ड असल्याचे सिद्ध झाले आहे. न्यूझीलंड फिरकीपटूने प्रत्येक निर्णायक क्षणी विकेट्स घेतल्या आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघाविरुद्ध त्याने उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. सोढीने या स्पर्धेत रिझवान, रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारख्या अनेक मोठ्या फलंदाजांना बाद केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
हार्दिकचा परतीचा मार्ग झाला खडतर! भारतीय संघात पुनरागमन करण्याआधी कराव्या लागणार ‘या’ गोष्टी