क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, असे म्हटले जाते. क्रिकेटच्या मैदानावर अशा अनेक आगळ्या वेगळ्या गोष्टी पाहायला मिळत असतात. फलंदाज चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडून चाहत्यांचे मनोरंजन करत असतात. परंतु, ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या स्पर्धेत असा काही प्रकार पाहायला मिळाला आहे. जे पाहून तुम्हाला खदखदून हसू आल्याशिवाय राहणार नाही.
ऑस्ट्रेलियामध्ये डब्ल्यूएनसीएल २०२१ -२२(WNCL 2021-22) लीग स्पर्धेचा थरार सुरू आहे. या स्पर्धेत काही ना काही असा प्रकार घडत असतो. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतो. अशातच या स्पर्धेतील एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये बेल्स पडली असूनसुद्धा फलंदाज बाद झाली नाही.
या स्पर्धेत रविवारी (१९ डिसेंबर) होबार्टच्या ब्लंडस्टोन अरेनामध्ये तस्मानियन वुमेन्स टायगर्स आणि क्वीन्सलँड फायर (Tasmanian women’s tigers vs Queensland fire) यांच्यात सामना खेळला जात होता. यादरम्यान क्वीन्सलँड फायर संघाची फलंदाजी सुरू असताना तस्मानियन वुमेन्स टायगर्स संघाकडून बेलिंडा वकारेवा १४ वे षटक टाकण्यासाठी गोलंदाजीला आली होती. या षटकातील एका चेंडूवर क्वीन्सलँड फायर संघाची फलंदाज जॉर्जिया वोल अप्रतिम चेंडूवर त्रिफळाचित झाली होती. बेलिंडा वकारेवाचा भन्नाट चेंडू फलंदाजाची दांडी गुल करून गेला तरी, पंचांनी तिला बाद घोषित केले नाही.(Bowled but given not out after fielding team did not appeal in Australia)
तर झाले असे की, ज्यावेळी फलंदाजाची दांडी गुल झाली, त्यावेळी गोलंदाज आणि यष्टिरक्षकाने मागणी केली नव्हती. यष्टिरक्षकाला जाणवले देखील नाही. ती चेंडूच्या मागे धावत गेली. परंतु, फलंदाज बाद असून पंचांनी तिला बाद घोषित केले नाही, हे पाहून समालोचक आश्चर्यचकित झाले होते. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
https://www.instagram.com/reel/CXpYN95BLpf/?utm_medium=copy_link
तसेच सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, प्रथम फलंदाजी करताना क्वीन्सलँड संघाने ४८ षटकात २२३ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात तस्मानियाने ४५.१ षटकांत धावांचा यशस्वी पाठलाग करत विजय मिळवला.
महत्वाच्या बातम्या :
“रोहितची फलंदाजी पाहण्यासाठी मी पैसेही खर्च करू शकतो”, संघसहकाऱ्याकडून कर्णधाराचे कौतुक
बीसीसीआयने विराटविरोधात आखले होते षडयंत्र? महत्वाची माहिती समोर