क्रिकेट हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळांपैकी एक आहे. या खेळात भरपूर पैसा आहे. भारतीय क्रिकेट बोर्ड अर्थातच बीसीसीआय जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे. या खेळातील सुपरस्टार विराट कोहली, रोहित शर्मा हे वर्षाला कोट्यवधी रुपये कमावतात. परंतु हे सर्व फलंदाज आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, गोलंदाज देखील तेवढेच पैसे कमवतात का? चला तर मग या बातमीद्वारे माहिती जाणून घेऊया.
क्रिकेटमध्ये फलंदाज आणि गोलंदाज यांचा पगार समान असतो का? तर याचं उत्तर हो किंवा नाही, असं दोन्ही असू शकतं. खरं पाहायला गेलं तर, बीसीसीआय आपल्या खेळाडूंना ग्रेडनुसार वेतन देत असते. त्यामुळे दोघांनाही समान पगार मिळू शकतो. बोर्ड दरवर्षी ही लिस्ट अपडेट करत असतो.
फेब्रुवारी 2024 मध्ये बीसीसीआयनं केंद्रीय करारांची लिस्ट जाहीर केली होती. त्यावेळी रोहित शर्मा , विराट कोहली, रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह यांना A+ ग्रेड देण्यात आलं होतं. खेळाडूंचे ग्रेड जेवढे चांगले, तेवढा त्यांचा पगार जास्त असतो. वरील खेळाडूना वर्षाला 7 कोटी मिळाले. ही लिस्ट फलंदाज आणि गोलंदाज यांना समान वेतन मिळतं याचा पुरावा म्हणून जाहीर केली जाते.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून नुकताच निवृत्त झालेला आर अश्विन, तसेच मोहम्मद शमी, केएल राहुल, हार्दिक पांड्या आणि शुबमन गिल यांना गेल्या वर्षी A ग्रेड मध्ये ठेवण्यात आलं होतं. त्यांना वार्षिक 5 कोटी रुपये पगार मिळतो. त्याचप्रमाणे B ग्रेड मधील खेळाडूना वार्षिक 3 कोटी मानधन तर C ग्रेड मधील खेळाडूंना वार्षिक 1 कोटी मानधन दिलं जातं. अशाप्रकारे भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराह वर्षाला 7 कोटी, मोहम्मद सिराज 5 कोटी तर कुलदीप यादव 1 कोटी वर्षाला कमावतो.
हेही वाचा –
विराट कोहलीने खरोखरच युवराज सिंगची कारकीर्द संपवली? पाहा VIDEO, काय म्हणतो युवी
“खेळाडूंची पूजा भारतीय क्रिकेटला मागे ढकलत आहे”, संजय मांजरेकरांचे खडे बोल
अश्विनच्या निवृत्तीपासून ते विराट-रोहितच्या भविष्यापर्यंत, बीसीसीआयच्या बैठकीत या मुद्द्यांवर होणार चर्चा