भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज खलील अहमद सध्या रुग्णालयात दाखल झाला आहे. त्याने स्वतः अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून ही पोस्ट शेअर करत सर्वांना माहिती दिली होती. खलील अहमद याने भारतीय संघासाठी 2018 मध्ये पदार्पण खेले होते. मात्र मागच्या तीन वर्षांपासून तो नियमितपणे संघाबाहेर आहे.
सोमवारी (12 डिसेंबर) खलील अहमद (Khaleel Ahmed) याने एक फोटो शेअर केला ज्यामध्ये तो रुग्णालयाच्या बेडवर पडलेला दिसत आहे. त्याने या फोटोसोबत लिहिले की, “क्रिकेटपासून दूर राहणे माझ्यासाठी कठीण आहे. हे खूप दुर्दैव आहे की, मी खराब स्थितीमध्ये या रणजी हंगामात खेळल्या जाणाऱ्या बहुतांश सामन्यांसाठी उपस्थित नसेल. मी पुनरागमन करत आहे आणि फिटनेस पुन्हा मिळवताच संघात परतण्याचा प्रयत्न करेल.”
खलील अहमद याने 2018 साली खेळल्या गेलेल्या आशिया चषकात हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. या आशिय चषकात रोहित शर्मा भारताचे नेतृत्व करत होता. अंतिम सामन्यात भारताने बांगलादेश संघाला पराभूत करून विजेतेपद पटकावले होते. खलीलने टी-20 फॉरमॅटमध्ये भारतासाठी पहिला सामना वेस्ट इंडीजविरुद्ध खेळला होता. त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा एकंदरीत विचार केला, तर त्याने एकूण 11 वनडे आणि 14 टी-20 मालिका खेळले आहेत. वनडे सामन्यांमध्या त्याने 15, तर टी-20 सामन्यांमध्ये 13 विकेट्स घेतल्या आहेत.
वेस्ट इंडीजविरुद्ध त्याने पाच षटकांमध्ये 13 धावा देत तीन विकेट्स घेतल्या होत्या, जे त्याचे सर्वोत्तम प्रदर्शन राहिले होते. त्याने या सामन्यात वेस्ट इंडीजचा दिग्गजा मार्लन सॅम्युअल्स, शिमरन हेटमायर आणि रोवमेन पॉवेल यांता तंबूत धाडले होते. 25 वर्षीय खलील अहमदने आयपीएलमध्ये चांगले योगदान दिले आहे. त्याने आतापर्यंत दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांसाठी आयपीएल सामने खेळले आहेत. यादरम्यान खेळलेल्या 34 सामन्यांमध्ये त्याने 38 विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये दिल्ली कॅफिटल्सने त्याला सर्वात पहिली संधी दिली होती. त्यावेळी त्याने अवघ्या 10 लाख रुपयांमध्ये दिल्लीचे प्रतिनिधित्व केले होते. पण नंतर आयपीएलच्या 11 व्या हंगामात सनरायझर्स हैदराबादने त्याला तीन कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते. (bowler who made his debut for India in 2018 admitted to hospital know about his careers)
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
संजूच्या आयर्लंडसाठी खेळण्याच्या प्रस्तावावर मोठी माहिती उघड; क्रिकेट बोर्ड म्हणतेय…
स्टोक्सला आपला युवा फलंदाज वाटतोय दुसरा विराट; पाकिस्तानला चोप-चोप चोपलंय






