इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील 32वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर वि. राजस्थान रॉयल्स संघात रंगला. या हंगामात बेंगलोर संघाचे नेतृत्व दुसऱ्यांदा विराट कोहली याच्या हातात आले. राजस्थानविरुद्ध फलंदाजी करताना विराट कोहली याला खास कामगिरी करता आली नाही. तो शून्यावर बाद झाला. याचा फायदा राजस्थानचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट याला झाला. यासह बोल्टने आयपीएलमधील खास विक्रम आपल्या नावावर केला.
झाले असे की, राजस्तान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाचा कर्णधार संजू सॅमसन (Sanju Samson) याने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. हा निर्णय राजस्थानचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट (Trent Boult) सार्थ ठरवताना दिसला. यावेळी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाकडून डावाची सुरुवात करण्यासाठी विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस मैदानात उतरले होते. यावेळी ही जोडी मोठी भागीदारी रचेल, अशी चाहत्यांसह संघालाही आशा होती. मात्र, यावर पाणी फेरले गेले. विराट बोल्ट टाकत असलेल्या पहिल्याच षटकातील पहिल्याच चेंडूवर एकही धाव न काढता बाद झाला. विशेष म्हणजे, विराटची विकेट ही बोल्टची 100वी आयपीएल विकेट ठरली.
Bowls the first ball of the match, strikes immediately and gets his 100th IPL wicket ⚡️⚡️#TATAIPL | #RCBvRR
Relive how Trent Boult dismissed Virat Kohli 🎥🔽https://t.co/ajq7uBv8QN
— IndianPremierLeague (@IPL) April 23, 2023
बोल्टचा विक्रम
विराटची विकेट काढताच बोल्टने खास पराक्रम नोंदवला. बोल्ट हा आयपीएलमध्ये फलंदाजांना सर्वाधिक वेळा शून्यावर बाद करणारा पाचवा गोलंदाज ठरला. या यादीत तो चौथ्या स्थानी कायम विराजमान झाला. आयपीएलमध्ये फलंदाजांना सर्वाधिक वेळा शून्यावर बाद करण्याचा विक्रम लसिथ मलिंगा याच्या नावावर आहे. त्याने 122 सामन्यात 36 वेळा फलंदाजाला शून्यावर बाद केले आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या स्थानी भुवनेश्वर कुमार असून त्याने 152 सामन्यात 24 वेळा फलंदाजाला शून्यावर बाद केले आहे. तिसऱ्या स्थानी ड्वेन ब्रावो आहे. त्याने 161 सामन्यात 24 वेळा फलंदाजाला शून्यावर तंबूत पाठवले आहे. यानंतर चौथ्या स्थानी बोल्ट असून त्याने 84 सामन्यात 22 वेळा फलंदाजाला तंबूत पाठवले आहे. उमेश यादव यानेही 22 वेळा फलंदाजाला शून्यावर बाद केले आहे. मात्र, त्याने 138 सामन्यात ही कामगिरी केल्यामुळे तो बोल्टच्या एक स्थान मागे आहे. (Bowlers to dismiss batters for DUCK most times in IPL see list)
आयपीएलमध्ये फलंदाजाला सर्वाधिकवेळा शून्यावर बाद करणारे गोलंदाज
36 – लसिथ मलिंगा (सामने- 122)
24 – भुवनेश्वर कुमार (सामने- 152)
24 – ड्वेन ब्रावो (सामने- 161)
22 – ट्रेंट बोल्ट (सामने- 84)*
22 – उमेश यादव (सामने- 138)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराटच्या फक्त तोंडातच दम! भांडणाविषयी बोलताना म्हणाला, ‘कुणी मला मारून निघून जाईल, पण मी…’
संजूच्या ‘रॉयल्स’ने जिंकला टॉस, RCB संघ विराटच्याच नेतृत्वाखाली देणार ‘टॉपर’ला झुंज