यंदाच २०२१ वर्ष शेवटच्या टप्प्यात आहे. अशात प्रत्येक खेळाडूला उत्सुकता असते की, कोणत्या खेळाडूने वर्षभरात चांगले प्रदर्शन केले आहे आणि कोणी खराब. हे संपूर्ण वर्ष टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी खास राहिले आहे, कारण यावर्षी आयसीसी टी२० विश्वचषक खेळला गेला. ऑस्ट्रेलियाने टी२० विश्वचषकाचे विजतेपद जिंकले.
आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये यावर्षी कोणत्या गोलंदाजांने सर्वोत्तम प्रदर्शन केले याविषयी देखील चाहत्यांना उत्सुकता आहे. आपण या लेखात तीन गोलंदाजांची माहिती घेणार आहोत, ज्यांनी यावर्षी आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक निर्धाव षटके टाकली आहेत.
फ्रँक सुबुगा (Frank Subuga) –
यावर्षी टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक निर्धाव षटके टाकण्याची कामगिरी युगांडाचा फिरकी गोलंदाज फ्रँक सुबुगा याने केली आहे. फ्रँकचे वय ४१ वर्ष आहे आणि त्याने या वयात ही अप्रतिम कामगिरी करून दाखवली आहे. त्याने १२ फ्रेंब्रुवारी २०२० मध्ये टी२० आंतरराष्ट्रीयमध्ये पदार्पण केले होते. त्याची खासियत आहे की, तो फलंदाजांना सहजासहजी धावा करू देत नाही आणि विकेट्स घेण्यामध्येही तो माहीर आहे.
यावर्षी त्याने टी-२० मध्ये जास्त विकेट्स तर घेतल्या नाहीत, पण जास्त धावाही खर्च केल्या नाहीत. यावर्षी खेळलेल्या १४ टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने ५२ षटके गोलंदाजी केली आणि यामध्ये १५ विकेट्स घेतल्या. यादरम्यान त्याने ६ निर्धाव षटके टाकली.
अधिक वाचा – ‘या’ भारतीय क्रिकेटपटूला यावर्षी सर्वाधिक वेळा केले सर्च, रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर
दिनेश नाकरानी (Dinesh Nakrani) –
यावर्षी आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये सर्वाधिक निर्धाव षटके टाकणाऱ्यांमध्ये युगांडाचा दिनेश नाकरानी दुसऱ्या क्रमांकावर आहे. दिनेश एक मध्यमगती वेगवान गोलंदाज आहे. त्याने यावर्षी त्याच्या अचूक लाईन-लेंथने फलंदाजांपुढे आव्हान उभे केले होते. यावर्षी त्याने २२ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आणि यामध्ये ३५ विकेट्स घेतल्या. यामध्ये त्याने ७ धावा देत ६ विकेट्स घेण्याचे सर्वश्रेष्ठ प्रदर्शन देखील केले.
यावर्षी त्याने फेकलेल्या ७४ षटकांमध्ये ५.०५ च्या इकोनॉमी रेटने ३७५ धावा खर्च केल्या आणि यादरम्यान ३ निर्धाव षटके देखील टाकली.
व्हिडिओ पाहा – युवी अन् भज्जीमुळं भर टीम मीटिंगमध्येच रडला दादा
मुश्ताफिजुर रहमान (Mustafizur Rahman) –
बांगलादेश संघाचा युवा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमान याने संघासाठी किफायतशीर गोलंदाजीचे प्रदर्शन केले. त्याने यावर्षी २० टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आणि यामध्ये २८ विकेट्स स्वतःच्या नावावर केल्या. यादरम्यान सर्वोत्तम प्रदर्शनात त्याने १२ धावा देऊन ४ विकेट्स घेतल्या होत्या. यावर्षी त्याने एकूण ६९.४ टी२० षटके टाकली आणि यामध्ये ४८७ धावा खर्च केल्या. यामध्ये तीन निर्धाव षटकांचा देखील समावेश होता.
याव्यतिरिक्त माल्टा संघाचा गोलंदाज बीलील मुहम्मद, नायजीरीयाच्या के पी आहो आणि तांजानियाच्या संजय कुमार ठाकुर यांनी देखील प्रत्येकी तीन-तीन निर्धाव षटके टाकली आहेत.
महत्वाच्या बातम्या –
प्रो कबड्डी २०२१: गुजरात जायंट्सची विजयाने सुरुवात; जयपूर पिंक पँथर्सला पाजले पराभवाचे पाणी
“गांगुलीला कर्णधारपदावर बोलण्याचा त्यांना अधिकार नाही”, दिग्गज भारतीय क्रिकेटर कडाडला
‘या’ भारतीय क्रिकेटपटूला यावर्षी सर्वाधिक वेळा केले सर्च, रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर