---Advertisement---

Ashes मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे पाच गोलंदाज, यादीतील दोघांनी घेतलाय जगाचा निरोप

On: शुक्रवार, जून 16, 2023 2:22 PM
Stuart Broad James Anderson
---Advertisement---

ऍशेस 2023 (Ashes 2023) शुक्रवारी (16 जून) सुरू होत आहे. 5 कसोटी सामन्यांची ही ऍतिहासिक ऍशेस मालिका पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता दिसत आहे. मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी दुपारी 3.50 मिनिटांनी सुरू होणार आहे. वर्मिंघमच्या एजबस्टन स्टेडियमवर हा सामना खेळला जाईल. ऍशेस म्हटलं की एकापेक्षा एक गोलंदाज आणि तितक्यात ताकदीने सामना करणारे फलंदाज पाहायला मिळतात. आपण या लेखात ऍशेसच्या इतिहासातील पाच सर्वात यशस्वी गोलंदाजांचा विचार करणार आहोत.

1. शेन वॉर्न –
ऑस्ट्रेलियाचा महान फिरकीपटू शेन वॉर्न (Shane Warne) ऍशेसमधील सर्वात यशस्वी गोलंदाज राहिला आहे. वॉर्नने आपल्या 14 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत एकूण 36 ऍशेस सामने खेळले, ज्याणध्ये 195 विकेट्स घेऊ शकला. यादरम्यान त्याने 4 वेळा 10 विकेट्स, तर 11 वेळा 5 विकेट्स घेतल्या आहेत. दरम्यान, मागच्या वर्षी मार्च महिन्यात वॉर्नने जगाचा निरोप घेतला.

2. ग्लेन मॅकग्रा –
यादीत दुसरा क्रमांक ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅकग्रा यांचा आहे. त्यांना आपल्या कारकिर्दीत इंग्लंडविरुद्धच्या या मालिकेत एकूण 30 सामने खेळले आणि एकूण 157 विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान 2.70च्या इकोनॉमी आणि 20 ची सरसरीने राखली.

3. एट ट्रंबल –
तिसऱ्या क्रमांकावर एच ट्रंबल यांचे नाव आहे. एच ट्रंबल ऑस्ट्रेलियाचे एक सिनियर खेळाडू रहोते. त्यांनी 1890 ते 1904 दरम्यान आपल्या 14 वर्षांच्या कारकिर्दीत 31 कसोटी सामने खेळले होते. यादरम्यानत त्यांनी 141 विकेट्स घेतल्या होत्या. 3 वेळा त्यांनी 10 विकेट्स घेतल्या होत्या. 1938 साली त्यांनी जगाचा निरोप घेतला.

4. स्टुअर्ट ब्रॉड –
यादीत चौथा क्रमांक इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) याचा आहे. भारतामध्ये स्टुअर्ट ब्रॉडला युवराज सिंगने मारलेल्या सहा षटकारांसाठी ओळखले जाते. असे असले तरी, इंग्लंडसाठी तो ऍशेसमध्ये सर्वात यशस्वी गोलंदाज राहिला आहे. त्याने या ऐतिहासिक मालिकेत आतापर्यंत 36 सामने खेळले असून यात 131 विकेट्स घेतल्या आहेत.

5. डिके लिटिल – 
यादीत पाचव्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचे डिके लिटिल आहेत. हे देखील ऑस्ट्रेलियाच्या वरिष्ठ खेळाडूंपैकी एक आहेत. लिटने आपल्या कारकिर्दीत एकूण 24 ऍशेस सामने खेळले आणि यात 131 विकेट्स घेतल्या. यादरम्यान एका सामन्यात त्यांना 10 विकेट्स देखील मिळाल्या होत्या. यादरम्यान त्यांची सरासरी 29च्या आसपास होती. (Bowlers with the most wickets in the Ashes)

महत्वाच्या बातम्या –
कोण आहे नभा गड्डमवार, जिच्या प्रेमात क्लीन बोल्ड झाला CSKचा हुकमी एक्का?
MPLच्या दुसऱ्या दिवशी रंगणार दोन सामन्यांचा थरार, वाचा कोण असणार आमने-सामने

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---