मुंबई । भारतात गेल्या दीड महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून लॉक डाउन लागू आहे. मैदाने बंद असल्याने खेळाडू आपापल्या घरात आहेत. कोरोनानंतर भारतीय क्रिकेटपटू मैदानावर पुनरागमन करतील. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याआधी स्थानिक सामन्यांच्या एका मालिकेचे आयोजन करावे, अशी मागणी भारताचे गोलंदाज प्रशिक्षक भरत अरुण यांनी केली आहे.
‘लॉकडाऊन बट नॉट आऊट’ यामध्ये बोलताना म्हणाले की, “आंतरराज्य प्रवास करण्यात अडचणी येणार आहेत. त्यामुळे खेळाडूंनी आपापल्या राज्यातील मैदानावर धावण्याचा सराव करावा. त्यासोबतच आपले कौशल्य पुन्हा प्राप्त करण्यासाठी मेहनत घ्यावी. खेळाडूंना फिटनेस प्राप्त करण्यासाठी कमीत कमी दीड महिन्यांचा वेळ लागतो.”
“आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यापूर्वी बीसीसीआयने एका मालिकेचे आयोजन करावे. तसे केल्यास खूप मदत होईल. आंतरराष्ट्रीय सामने सुरू होण्यासाठी अजून सहा ते आठ आठवड्यांचा कालावधी लागू शकतो. त्यापूर्वी आम्ही आमच्या कौशल्यावर काम करणार आहोत. या शिबिरात तंदुरुस्तीवर भर देणार आहोत. ज्यामुळे परिस्थितीस अनुसार आम्ही आमच्या सरावात प्रगती करू.”
57 वर्षीय भरत अरुण म्हणाले की, ” मी गोलंदाजांच्या बाबतीत चिंतीत नाही. कारण गेल्या दोन महिन्यापेक्षा जास्त वेळ त्यांच्याकडे वेळ होता. हा वेळ स्वतःला फिट ठेवण्यास मदत होणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या खेळाडूंना विशेषतः आमच्या खेळाडूंना स्वतःला फिट ठेवण्यासाठी खूप चांगला वेळ मिळालेला आहे. छोट्या छोट्या दुखापतीतून सावरण्यासाठी चांगली संधी मिळाली आहे. “