वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेला गुरुवारपासून (दि. 05 ऑक्टोबर) थाटात सुरुवात झाली. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघ आमने-सामने आहेत. या सामन्यात मागील हंगामातील उपविजेत्या न्यूझीलंड संघाचा प्रभारी कर्णधार टॉम लॅथम याने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी न्यूझीलंडकडून गोलंदाजी करताना ट्रेंट बोल्ट याच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली.
बोल्टचा विक्रम
झाले असे की, नाणेफेक गमावून फलंदाजीला आलेल्या इंग्लंडकडून डावाची सुरुवात करण्यासाठी जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) आणि डेविड मलान (Dawid Malan) खेळपट्टीवर उतरले. यावेळी ट्रेंट बोल्ट (Trent Bould) गोलंदाजी करत होता. बोल्टने पहिला चेंडू टाकताच त्याच्या नावावर खास विक्रम रचला गेला. तो वनडे विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेत पहिला चेंडू टाकणारा गोलंदाज ठरला.
विशेष म्हणजे, अखेरच्या 2019च्या विश्वचषकातील अखेरचा चेंडू टाकण्याचा मानही बोल्टलाच मिळाला होता. त्यामुळे तो मागील विश्वचषकातील शेवटचा आणि त्याच्या पुढील विश्वचषकातील पहिला चेंडू टाकणारा विश्वचषक इतिहासातील तिसरा गोलंदाज ठरला. त्याने या हंगामातील पहिल्या षटकात एकूण 12 धावा खर्च केल्या. यामध्ये 1 षटकार आणि 1 चौकाराचाही समावेश होता.
Bowling the last ball of a World Cup and then delivering the first ball of next World Cup:
Craig McDermott
– Last ball of 1987 World Cup
– First ball of 1992 World CupNuwan Kulasekara
– Last ball of 2011 World Cup
– First ball of 2015 World CupTrent Boult
– Last ball of…— Bharath Seervi (@SeerviBharath) October 5, 2023
मॅकडर्मोट आणि कुलसेकराने केलेली कामगिरी
मागील विश्वचषकातील अखेरचा चेंडू आणि पुढील विश्वचषकातील पहिला चेंडू टाकण्याचा कारनामा सर्वप्रथम ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज गोलंदाज क्रेग मॅकडर्मोट (Craig McDermott) याने केला होता. त्याने 1987 विश्वचषकातील अखेरचा चेंडू आणि 1992 विश्वचषकातील पहिला चेंडू टाकण्याचा विक्रम केला होता.
त्यानंतर श्रीलंकेच्या नुवान कुलसेकरा (Nuwan Kulasekara) याने 19 वर्षांनंतर ही कामगिरी केली. त्याने 2011च्या विश्वचषकातील अखेरचा चेंडू टाकला होता आणि त्यानंतर 2015च्या विश्वचषकातील पहिला चेंडू टाकण्याचा पराक्रम केला होता.
विशेष म्हणजे, वरील खेळाडूंनी हा कारनामा सुपर ओव्हर वगळता केला आहे. (Bowling the last ball of a World Cup and then delivering the first ball of next World Cup Trent Boult)
हेही वाचा-
ना भारत, ना इंग्लंड-ऑस्ट्रेलिया, ‘हा’ संघ विश्वचषकाचा प्रबळ दावेदार; झहीरची भविष्यवाणी
CWC23: कर्णधारांच्या बैठकीत बावुमाला डुलकी! फोटो व्हायरल होताच म्हणाला, ‘मी झोपलो नव्हतो…’