स्पेनच्या के ला नुसिया येथे झालेल्या जागतिक युवा बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताला घवघवीत यश मिळाले. तब्बल 73 देशांनी सहभाग नोंदवलेल्या या स्पर्धेत भारतीय संघाने 11 पदकांची लयलूट करत अव्वलस्थान पटकावले. रविवारी (26 नोव्हेंबर) भारताने तीन सुवर्णपदके आपल्या नावे केली. यामध्ये पुण्याच्या देविका घोरपडेनेही सुवर्णपदक पटकावले.
https://www.instagram.com/p/Clci1RxIPAw/?igshid=YmMyMTA2M2Y=
के ला नुसिया येथे झालेल्या या स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी महाराष्ट्राची देविका 52 किलो वजनी गटात सहभागी झाली होती. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात तिची लढत इंग्लंडच्या लॉरेन्स मेकी हिच्याशी झाली. राष्ट्रीय विजेती असलेल्या देविकाने तिला कोणतीही संधी न देता सुवर्णपदक आपल्या नावे केले.
रविवारी भारताला पहिले सुवर्णपदक चेन्नईच्या विश्वनाथ सुरेश यांनी मिळवून दिले. 48 किलो वजने गटात त्याने फिलिपाईन्सच्या खेळाडूला पराभूत केले. तर, दिवसातील तिसरे सुवर्णपदक वंशज याने आपल्या नावे केले. महिला बॉक्सर भावना शर्मा व आशिष यांना मात्र अंतिम फेरीत पराभूत व्हावे लागले.
(Boxer Devika Ghorpade won gold medal in youth Boxing championship)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी: क्रिकेटजगतात पुन्हा फिक्सिंगचे भूत? पाकिस्तानचा ‘तो’ सामना होता फिक्स
‘मिस्टर 360 नाही 720 डीग्री…’, सूर्याचा रिव्हर्स स्वीप षटकार पाहून चाहते भलतेच खुश