---Advertisement---

धक्कादायक! फाईट सुरू असताना बॉक्सरच्या चेहऱ्याला मुक्का लागून मृत्यू, पहा व्हिडिओ

On: बुधवार, फेब्रुवारी 3, 2021 9:20 AM
---Advertisement---

आपण खेळामध्ये दुखापती होण्याच्या अनेक घटना पाहिल्या असतील. परंतु, खेळ सुरू असताना प्रतिस्पर्धी खेळाडू मार्फत मृत्यू झाल्याच्या घटना आपल्याला क्वचितच ऐकू येतात. असाच एक धक्कादायक प्रकार घडलाय पाकिस्तान स्थित कराची येथे. ३३ वर्षीय मुक्केबाज मोहम्मद असलम याचा चेहऱ्यावर मुक्का लागून मृत्यू झाला आहे. मोहम्मद असलम हा किक बॉक्सिंगमुळे ओळखला जात होता.

कसा झाला मृत्यू

शनिवारी (दिनांक ३० जानेवारी ) रोजी कराची येथे एका स्थानीय क्लब मध्ये पाकिस्तान बॉक्सिंग काउन्सिल द्वारे ‘ फाईट नाईट सिरीज’ चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या क्रुज वेट कॅटेगरीमध्ये मोहम्मद असलम याचा सामना मोहम्मद वली याच्यासोबत होता. या सामन्यात मोहम्मद वली याने मोहम्मद असलम याच्या चेहऱ्यावर मुक्का मारला आणि असलम जमिनीवर पडला. याच कारणास्तव त्याचा मृत्यू झाला.

सोशल मीडियावर व्हिडिओ प्रचंड व्हायरल

या सामन्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसून येत आहे. असलम यांना प्रतिस्पर्धी खेळाडूने चेहऱ्यावर मुक्का मारला आणि तो जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत दिसून आला. माहितीनुसार, त्यानंतर त्वरित त्याला रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांचा आयसीयूमध्ये उपचार सुरू असताना रविवारी मृत्यू झाला.

QUETTA: International boxer Aslam Khan died of five injuries while gaining benefits

आमचा या बॉक्सिंग परिषदेशी काही संबंध नाही : पाकिस्तान बॉक्सिंग फेडरेशन

या धक्कादायक प्रकारानंतर पाकिस्तान बॉक्सिंग फेडरेशन चे महासचिव कर्नल नासिर तुंग यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले,”आमचा या तथाकथित बॉक्सिंग परिषदेशी काही एक संबंध नाही आहे. आमच्या परवानगी शिवाय ही स्पर्धा घेण्यात आली होती.”

पुढे ते म्हणाले,” पेशेवर मुक्केबाज बनण्यासाठी काही गोष्टी आवश्यक असतात.पाकिस्तान बॉक्सिंग फेडरेशनने दोन सदस्यांची निवड केली आहे. ज्यात असगर बलोच आणि युनिस पठाण यांचा समावेश आहे. या दोन्ही सदस्यांना या प्रकरणाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच अनेक खेळाडूंनी त्यांच्या समर्थनात, जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाही करण्याची मागणी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजीची परंपरा पुढे नेणारा नॅथन कुल्टर-नाईल

सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या अशोक डिंडाच्या नावावर आहे ‘हा’ मोठा विक्रम

टेस्ट चॅम्पियनशिप : न्यूझीलंड तर फायनलमध्ये पोहचले आता भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलियासाठी ‘अशी’ आहेत समीकरणे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---