क्रिकेटमध्ये एखादा फलंदाज धावबाद झाल्यानंतर त्यात आश्चर्याची काहीच गोष्ट नसते. फलंदाज अनेकदा कमी वेगाने धावल्यामुळे किंवा अप्रतिम क्षेत्ररक्षणामुळे धावबाद झाल्याचे पाहिले गेले आहे. काही वेळा फलंदाजाने मारलेला सरळ शॉट गोलंदाजाच्या हाताला लागून स्टंपला गालतो आणि नॉन स्ट्राइकरवरील फलंदाज जर क्रीजच्या पुढे गेला असेल, तर विकेट गमावतो. परंतु, बांगलादेश प्रीमियर लीग (बीपीएल २०२२) मध्ये शुक्रवारी वेस्ट इंडीजचा आंद्रे रसेल (Andre Russell) ज्या पद्धतीने बाद झाला, ते पाहून अनेकांना स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही.
शुक्रवारी ढाकामध्ये बीपीएल २०२२ ची सुरुवात झाली. स्पर्धेतील दुसऱ्याच सामन्यात रसेल आश्चर्यकारक प्रकारे धावबाद झाला. हा सामना मिनिस्टर ग्रुप ढाका आणि खुलना टायगर्समध्ये खेळला गेला. आंद्रे रसेल मिनिस्टर ग्रुप ढाका संघासाठी खेळतो, ज्याचा कर्णधार बांगलादेशचा दिग्गज अष्टपैलू मेहमुदुल्लाह आहे. या सामन्यात अनेकजण रसेलची फटकेबाजी पाहण्यासाठी इच्छूक होते, पण त्यांना तो अनपेक्षितपणे धावबाद होताना दिसला. सोशल मीडियावर याविषयी चर्चा होत आहे, तसेच हा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
WHAT A BIZARRE RUN OUT! 😱
📺 Watch the #BPL2022 match live on #FanCode 👉 https://t.co/wPDmICv8cM#BPLonFanCode pic.twitter.com/O43gKKfLSi
— FanCode (@FanCode) January 21, 2022
ढाका संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी केली. डावाच्या १५ व्या षटकात आंद्रे रसेल खेळपट्टीवर फलंदाजी करत होता. तसेच त्याच्यासोबत नॉन स्ट्राइकवर कर्णधार मेहमुदुल्लाह देखील खेळपट्टीवर होता. थिसारा परेरा या षटकात गोलंदाजी करत होता. षटकाच्या शेवटचा चेंडू रसेलने थर्डमॅनच्या दिशने खेळला आणि एक धाव घेण्यासाठी धावला. यानंतर खरे नाट्य सुरू झाले. थर्डमॅनवरील क्षेत्ररक्षकाने ऑन स्ट्राइकवरील स्टंपवर चेंडू फेकून मारला. हा चेंडू अगदी बरोबर निशाण्यावर लागला, पण मेहमुदुल्ला तोपर्यंत क्रीजवर पोहोचला होता.
चेंडू स्टंपला लागल्यानंतर उडून नॉन स्ट्राइकच्या दिशेने वळला आणि थेट स्टंपवर जावून लागला. यानंतर असे दिसले की, चेंडू नॉन स्ट्राइकच्या स्टंपवर जेव्हा लागला, तोपर्यंत रसेल क्रीजवर पोहचला नव्हता. याच कारणास्तव रसेलने स्वस्तात विकेट गमावली. ज्या चेंडूवर त्याला सहज एक धाव मिळाली असती, त्याच चेंडूवर त्याने विकेट गमावल्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
दरम्यान, रसेलने या सामन्यात तीन चेंडूत सात धावा केल्या. त्याच्या विकेटचा परिणाम संघाच्या एकंदरित धावसंख्येवर पडला. मिनिस्टर ग्रुप ढाकाने या सामन्यात सहा विकेट्सच्या नुकसानावर १८३ धावा केल्या.
महत्वाच्या बातम्या –
IPL 2022 | नवख्या लखनौचा मोठा डाव, केएल राहुलला संघाचा कर्णधार घोषित! मोजलेली रक्कम थक्क करणारी
मारक्रमची विजयी धाव आणि कर्णधार राहुलवर बसला लाजीरवाण्या पराक्रमाचा शिक्का; आयुष्यभर नाही विसरणार
भारताने सामना गमावला आणि मालिकाही! द. आफ्रिकेचा दुसर्या वनडेत ७ गड्यांनी शानदार विजय
व्हिडिओ पाहा –