भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथ्या आणि निर्णायक कसोटी सामन्याला गुरुवारपासून ( 9 मार्च) सुरुवात झाली. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात हे क्रिकेटचे 75वे वर्ष आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअम येथे खेळल्या जात असलेल्या या सामन्यात वापरण्यात येत असलेल्या खेळपट्टीवर आता वेगळी चर्चा सुरू झाली आहे. दोन ऑस्ट्रेलियन माजी क्रिकेटपटूंनी या खेळपट्टीबाबत साशंकता करता व्यक्त केली.
अहमदाबाद येथील खेळपट्टी पहिल्या दिवशी फलंदाजांना पोषक असलेली दिसून येत आहे. मालिकेत यापूर्वी वापरण्यात आलेल्या तीनही सामन्यातील खेळपट्टीवर चेंडू पहिल्या दिवशीपासून फिरकी घेताना दिसलेला. त्यामुळे अशी खेळपट्टी दिल्याने ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू ब्रॅड हॅडिन व मार्क वॉ चकित झाले.
हॅडिन म्हणाला, “भारतीय कर्णधार रोहित शर्मा इंदोर कसोटीच्या आधी म्हणालेला की, अहमदाबादमध्ये आम्हाला वेगवान गोलंदाजांना मदत करेल अशी खेळपट्टी पाहायला आवडेल. कारण, भारताला ती कसोटी गमावेल असे वाटले नव्हते. परंतु, पराभूत झाल्याने भारताने अखेरच्या क्षणी आपली पारंपारिक खेळपट्टी तयार केली.”
दुसरीकडे, सध्या समालोचन करत असलेला मार्क वॉ म्हणाला,
“सामना कोणत्या खेळपट्टीवर होणार आहे हे सामन्याच्या 48 तास आधी देखील क्युरेटरला माहीत नव्हते. काऊंटी क्रिकेटमध्ये अशाप्रकारे तीन खेळपट्टी तयार करून अखेरच्या वेळी एक खेळपट्टी निवडली जाते. मला माहित नाही इथे नक्की काय सुरू आहे? मात्र, यावर निर्णय व्हायला हवा.”
सामन्याच्या आधी बोलताना ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने आपल्याला क्युरेटरने सामन्यासाठी कोणती खेळपट्टी वापरली जाणार, हे सांगितले नाही असे म्हटलेले. तर, भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडी यांनी सामना काळ्या मातीच्या खेळपट्टीवर होणार असल्याचे स्पष्ट केलेले.
(Brad Haddin And Mark Waugh Raised Questions Over Pitch Used In Ahmedabad Test)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कर्णधार म्हणून स्मिथ जेव्हाजेव्हा भारतात आला तेव्हा नडलाय, पाहा ही जबरदस्त आकडेवारी
‘टीम इंडियाला भासतेय पंतची उणीव’, केएस भरतच्या गचाळ क्षेत्ररक्षणामुळे नेटकऱ्यांना आठवला रिषभ, Video






