ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (Australia vs England) या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये ऐतिहासिक ऍशेस मालिका (Ashes series) सुरू आहे. ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने ९ गडी राखून विजय मिळवला होता. तर, दुसऱ्या कसोटी सामन्यात देखील ऑस्ट्रेलिया संघाने २७५ धावांनी विजय मिळवला होता. या विजयासह ऑस्ट्रेलिया संघाने कसोटी मालिकेत २-० ची आघाडी घेतली आहे. इंग्लंड संघाच्या या निराशाजनक कामगिरीनंतर इंग्लंडचा कर्णधार जो रूटवर (Joe root) जोरदार टीका होऊ लागली आहे. तर अनेकांनी त्याला कर्णधार पदावरून काढून टाकण्याची मागणी केली आहे. दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराने देखील याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
जो रूटने ऑस्ट्रेलिया संघाविरुद्धचा दुसरा कसोटी सामना गमावताच तो सर्वाधिक कसोटी सामने गमावणारा इंग्लिश कर्णधार ठरला आहे. त्याने आतापर्यंत २३ कसोटी सामने गमावले आहेत. या निराशाजनक कामगिरीनंतर अनेकांनी त्याला कर्णधार पदावरून काढून टाकण्याची मागणी केली आहे. तर, अनेक दिग्गज खेळाडूंनी कर्णधारपदासाठी पर्याय सुचवायला सुरुवात केली आहे. अशातच माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू ब्रॅड हॅडिनचे (Brad Haddin) म्हणणे आहे की, जो रूट ऐवजी बेन स्टोक्स(Ben stokes) संघाचे नेतृत्व करू शकतो.
हे वाचा : भारत, पाकिस्तानसह ‘असे’ आहेत अंडर-१९ विश्वचषकासाठीचे सर्व संघ, वाचा एका क्लिकवर
ब्रॅड हॅडिनने याबाबत बोलताना म्हटले की, “इंग्लंड संघाने सामन्याच्या चौथ्या दिवशी चांगले प्रदर्शन केले. त्यावेळी जो रूट मैदानाच्या बाहेर होता. तर बेन स्टोक्स संघाचे नेतृत्व करत होता. त्यावेळी तो खूप शांत दिसून येत होता. त्याच्याकडे एक रणनिती होती आणि गोलंदाजांनी देखील फुल लेंथ गोलंदाजी केली. अवघ्या २० धावांवर ऑस्ट्रेलियाचे ४ गडी बाद झाले होते. ज्यामुळे यजमान संघ अडचणीत सापडला होता. परंतु जो रूट मैदानावर येताच इंग्लंड संघ अडचणीत येऊ लागला. त्यामुळे मला वाटते की, त्यामुळे बेन स्टोक्स हा हुशार कर्णधार आहे असे मला वाटते.”
तसेच ऑस्ट्रेलिया संघाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने(Ricky ponting) देखील जो रूटच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले आहे. जो रूटने पराभवासाठी गोलंदाजांना दोषी ठरवले होते. रिकी पाँटिंगने आश्चर्य व्यक्त करत म्हटले की, “जेव्हा मी ही गोष्ट ऐकली त्यावेळी मी खुर्चीवरून खाली पडणार होतो. गोलंदाजीमध्ये बदल करण्याची जबाबदारी कोणाची आहे? मग तुम्ही नेतृत्व का करताय? तुम्ही तुमच्या गोलंदाजांना कोणत्या लाईनवर गोलंदाजी करायची हे प्रोत्साहन देऊ शकत नसाल, तर तुम्ही मैदानावर काय करत आहात?” असा प्रश्न रिकी पाँटिंग यांनी उपस्थित केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
क्रिकेट कारकिर्द धोक्यात असताना अश्विनसाठी देवासारखा धावून आलेला धोनी! दिलेला ‘कामाचा सल्ला’
‘कितने आदमी थे’ डायलॉगवर शिखर धवनची कडक ऍक्टिंग, सिनेमातील ‘गब्बर’लाही देईल टक्कर!
Video: लाईव्ह सामन्यातील ‘ब्रोमान्स’ची इंटरनेटवर तुफान चर्चा, कर्णधाराचे मैदानातच गोलंदाजाला किस
हे नक्की पाहा :