---Advertisement---

‘पुजारामुळे नॉन स्ट्राईकवरील फलंदाजाला बाद होण्याचा धोका’; पाहा कुणी केलंय हे वक्तव्य?

On: सोमवार, जून 21, 2021 3:41 PM
---Advertisement---

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात झाली आहे. भारतीय संघ पहिल्या डावात केवळ २१७ धावसंख्येवर सर्वबाद झाला आहे. भारतीय संघाची फलंदाजीची भिंत चेतेश्वर पुजारा पहिल्या डावात दोन आकडी धावाही करु शकला नाही. त्याला आपले खाते उघडायला ३५ चेंडू लागले. एवढा हळू खेळ पाहून अनेकांनी पुजाराच्या खेळण्याच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू ब्रॅड हॉगनेही पुजाराच्या फलंदाजीवर भाष्य केले आहे.

शनिवारी (१९ जून) अंतिम सामन्याला सुरुवात झाली. विराटची नाणेफेक हरण्याची परंपरा ही कायम राहिली. न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २१७ धावा केल्या. दरम्यान एकाही भारतीय फलंदाजाला अर्धशतकही मारता आले नाही. भारतीय संघाची फलंदाजीची भिंत चेतेश्वर पुजारा तर ५४ चेंडूत केवळ ८ धावा करत तंबूत परतला. तो वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टचा तो शिकार बनला.

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू ब्रॅड हॉगने आपल्या यूट्यूब चॅनलवर, या मोठ्या सामन्यातील चेतेश्वर पुजाराच्या खेळाविषयी आपले मत मांडले. त्याने म्हटले की, “ऑस्ट्रेलियामध्ये तुम्ही हळूवार फलंदाजी केली तर ते ठीक आहे. पण इंग्लंडच्या परिस्थितीत चेंडू बऱ्याच दिवस स्विंग होत राहतो. पुजाराच्या खेळीमुळे बरेच प्रश्न निर्माण होतात. त्याने बर्‍याच वेळानंतर आपले खाते उघडले. दुसर्‍या टोकाला उभे असलेला फलंदाज जर चांगली कामगिरी करत असेल. तर पुजाराची हळू फलंदाजी पाहून तो संयम गमावू शकतो आणि धावांच्या दबावाखाली तो विकेट गमावू शकतो.”

ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर चेतेश्वर पुजाराने संथ पण चमकदार फलंदाजी केली होती. त्यामुळे भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत ऐतिहासिक विजय मिळवला होता. आता सर्वांना त्याच्याकडून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मोठ्या आकडी खेळीची अपेक्षा होती. पण तो पहिल्या डावात अपयशी ठरला. तथापि, सध्या इंग्लंडमधील परिस्थिती फलंदाजासाठी योग्य नाही. त्यामुळे चेतेश्वर पुजारासमोर एक मोठे आव्हान असल्याचे पाहायला मिळाले आहे.

महत्वाच्या बातम्या

सलग तीन डावांत शतक, अर्धशतक व शून्य धावेवर बाद होणारा ‘तो’ ठरला पहिला क्रिकेटर

जाळ अन् धूर संगटच! स्म्रीतीच्या फोटोवर कोट्यावधी चाहते घायाळ; म्हणे, ‘अभिनेत्रीहूनही सुंदर’

अवघ्या २२ धावांवर अष्टपैलू अश्विन तंबूत, पत्नीने चकित होत दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---