Wednesday, February 1, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

टी२० विश्वचषकापूर्वी ‘हिटमॅन’ला सुधाराव्या लागतील टीम इंडियातील ‘या’ दोन कमतरता; पण कोणत्या?

टी२० विश्वचषकापूर्वी 'हिटमॅन'ला सुधाराव्या लागतील टीम इंडियातील 'या' दोन कमतरता; पण कोणत्या?

February 28, 2022
in क्रिकेट, टॉप बातम्या
Team-India

Photo Courtesy: Twitter/BCCI


ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकी गोलंदाज ब्रॅड हाॅगने (Brad Hogg) भारतीय संघाच्या दोन कमी सांगितल्या आहेत. २०२२ च्या टी२० विश्वचषकाचे आयोजन ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहे. भारत आणि श्रीलंका संघांमध्ये ३ सामन्यांची टी२० मालिका नुकतीच पार पडली. या मालिकेनंतर हाॅगने व्यक्तव्य केले आहे. भारताला मधल्या षटकांमध्ये फिरकी गोलंदाजी आणि डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजीमध्ये सुधारणा करावी लागेल, असेही तो म्हणाले आहे.

ब्रॅड हाॅग आपल्या युट्यूब चॅनलवर म्हणाला की, टी२० क्रिकेटमध्ये भारताच्या वेगवान गोलंदाजीच्या आक्रमणाची खोली असाधारण आहे. जर मी टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघ निवडत असेल, तर मला भुवनेश्वर कुमार आणि दीपक चाहरला सिराज, आवेश खानसोबत तेथे ठेवणे कठीण जाईल. हर्षल पटेल सुद्धा गोलंदाजी करेल.”

तो म्हणाला, “त्याच्याकडे सर्वोत्तम फिरकी गोलंदाज देखील आहेत. प्रथम २ नंतर त्यांचे फलंदाज फक्त विस्फोट करत आहेत. अय्यर किती चांगले आहेत? आयपीएल लिलावात सर्वोत्तम निवड.”

हॉगला असे वाटते की, रोहितला अजूनही दोन महत्वाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. एक म्हणजे मधल्या षटकांतील फिरकी गोलंदाजी आणि डेथ गोलंदाजी. व्यवस्थापनाने फिरकी गोलंदाजीत आणखीण विविधता आणावी अशी त्याची इच्छा आहे.

“मला वाटते की, रोहित शर्मा मधल्या षटकांमध्ये फिरकी गोलंदाजी आणि डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी पाहत असेल. मला वाटते की, फिरकीमध्ये थोडे जास्त बदल होऊ शकतात असे त्याला वाटते. कुलदीप यादव आणि जडेजा हे दोन चांगले गोलंदाज आहेत, पण जेव्हा त्यांच्यावर दबाव असतो, तेव्हा विरोधी संघ त्यांच्यावर वर्चस्व गाजवतात.”

“जेव्हा श्रीलंका संघ कुलदीपविरुद्ध खेळला, तेव्हा त्यांच्याकडे त्याचा सामना करण्यासाठी एकही चेंडू नव्हता. जेव्हा तो वळत नाही, तेव्हा जडेजा काहीवेळा थोडा वेगवान गोलंदाजी करतो, त्याला जमिनीवर हिट करणे सोपे असते, त्यामुळे ते लहान क्षेत्र असते. टी२० विश्वचषकात भारताला हरवणे कठीण होईल,” असेही तो पुढे म्हणाला.

भारत आणि श्रीलंका संघात २ सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. यातील पहिल्या कसोटी सामन्याला ४ मार्चपासून सुरुवात होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

विश्वचषकापूर्वी स्म्रीती मंधानाच्या तब्येतीबाबत भारतीय संघासाठी खुशखबर; डोक्याला लागला होता वेगवान बाउंसर

ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज यष्टीरक्षक हृदयविकाराच्या झटक्यानंतर गेले कोमात; देतायत आयुष्याच्या लढाईशी झुंज

श्रीलंकेला क्लीन स्वीप देत भारताने लावली विक्रमांची रांग! मायदेशात सर्वाधिक विजयाबरोबरच ‘हे’ पराक्रमही नावावर 


Next Post
Rohit-Sharma-And-Jaydev-Shah

जरा इकडे पाहा! संघातील खेळाडूला नाही, तर 'या' व्यक्तीला रोहित शर्माने दिली ट्रॉफी; व्हिडिओ व्हायरल

Indian-Women-Team

Women's World Cup 2022: पाकिस्तानविरुद्ध होणार भारताचा पहिला सामना, जाणून घ्या टीम इंडियाचे पूर्ण वेळापत्रक

Photo Courtesy: Twitter/Gujarat Titans

आयपीएल सुरू होण्याआधीच नवख्या गुजरात टायटन्सला हादरा! करोडपती खेळाडूचा खेळण्यास नकार

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143