---Advertisement---

“एमएस धोनी चेन्नईला सोडणार नाही, तो संघाचा महाराजा आहे”

On: मंगळवार, जुलै 6, 2021 8:33 PM
MS-Dhoni
---Advertisement---

भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी हा सर्वात लोकप्रिय क्रिकेटपटूंपैकी एक आहे. धोनीने २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय  क्रिकेटला राम राम केले होते. तरी देखील क्रिकेट चाहते त्याला मैदानात खेळताना पाहण्यासाठी उत्सुक असतात. सध्या चाहत्यांना धोनी केवळ इंडियन प्रीमीयर लीगमध्येच खेळताना दिसतो. अशातच एका युजरने सोशल मीडियावर प्रश्न विचारला होता की, जर धोनीला चेन्नई सुपर किंग्स कायम नाही केले तर काय होईल? या प्रश्नाचे दिग्गज ऑस्ट्रेलियन खेळाडूने उत्तर दिले आहे.

क्रिकेट विश्वातील दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्स संघाने तीन वेळेस जेतेपद पटकावले आहे. अशातच ऑस्ट्रेलियन संघाचा माजी गोलंदाज ब्रॅड हॉग याला ट्विटरवर एक प्रश्न विचारण्यात आला होता की, जर आयपीएल २०२२ स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स संघाने एमएस धोनीला संघात कायम नाही केले तर त्याची काय भूमिका असेल? यावर ब्रॅड हॉगने उत्तर देत लिहिले की, ‘एमएस धोनी चेन्नईला सोडणार नाही. तो त्या फ्रँयाचझीचा महाराजा आहे. तो प्रशिक्षक बनू शकतो.’ (Brad hogg replies if ms dhoni not retained by Chennai super kings for 2022)

बीसीसीआयने २०२२ आयपीएल हंगामासाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. आगामी आयपीएलच्या १५ व्या हंगामात भरपुर बदल पाहायला मिळणार आहे. यातील सर्वात मोठा बदल म्हणजे या हंगामात ८ नव्हे तर १० संघ खेळणार आहे. तसेच सामन्यांची संख्या देखील वाढवली जाणार आहे.

यापूर्वी देखील आयपीएल स्पर्धेत ८ पेक्षा जास्त संघानी सहभाग घेतला आहे. २०११ मध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेत ११ संघांता सहभाग होता. त्यानंतर २०१४ मध्ये या स्पर्धेत संघांची संख्या पुन्हा एकदा ८ करण्यात आली होती. तेव्हापासून ८ संघ जेतेपद पटकावण्यासाठी मैदानात उतरत आहेत.

तसेच चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी हा पहिल्या हंगामापासूनच चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार आहे. जेव्हा चेन्नई संघावर २ वर्षांसाठी निर्बंध लावण्यात आले होते, तेव्हा एमएस धोनीने रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते. माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार, आयपीएलचे नवीन नियम लागू झाल्यानंतर चेन्नई सुपर किंग्स संघाला जर धोनीला कायम करायचे असेल तर, त्यांना १२.५ ते १५ कोटी रुपये खर्च करावे लागू शकते.

महत्वाच्या बातम्या-

धक्कादायक! इंग्लंडच्या वनडे संघातील ७ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह, एका रात्रीत बदलावा लागणार संपूर्ण संघ

‘चांगली कामगिरी करणाऱ्या प्रशिक्षकाला हटवण्याची गरज नाही’, रवी शास्त्रींना दिग्गज कर्णधाराची साथ

आयपीएल नव्हे, तर ‘या’ टी२० लीग स्पर्धेत खेळताना दिसून येणार पठाण बंधू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---