ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आपल्या उत्कृष्ट अशा फलंदाजीमुळे भारतीय संघाच्या विजयामध्ये मोलाचे योगदान दिलेल्या युवा खेळाडू शुबमन गिल याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. अशातच एका दिग्गज खेळाडूने त्याच्याबद्दल केलेले वक्तव्य चर्चेचा विषय बनले आहे. युवा सलामीवीर पृथ्वी शॉ याच्या खराब फॉर्ममुळे गिलला मेलबर्न कसोटीद्वारे पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्याने त्या संधीचे सोने केले आणि सर्वांना आपली प्रतिभा दाखवून दिली.
गिलने ऑस्ट्रेलियन संघाच्या गोलंदाजांचा निडर होऊन सामना केला आणि पदार्पणाच्या सामन्यातील पहिल्या डावात ४५ धावांची खेळी तर दुसऱ्या डावात ३५ धावांची खेळी केली. तसेच त्याने अखेरच्या ब्रिस्बेन कसोटीत ९१ धावांची खेळी करत भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाचे योगदान दिले.
शुबमन गिलबद्दल काय म्हणाले ब्रॅड हॉग ?
ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू ब्रॅड हॉग यांनी गिलचे कौतुक करत म्हटले की, “त्याच्यामध्ये क्रिकेटमधील सर्व शॉट्स खेळण्याची क्षमता आहे. मी त्याच्या खेळावर सर्वात जास्त तेव्हा प्रभावित झालो जेव्हा मी त्याला पॅट कमिन्स आणि जोश हेजलवुड यांच्या शॉर्ट पीच गोलंदाजीवर खेळताना पाहिले. तो प्रत्येकवेळी तयार होता. तसेच त्यांच्या गोलंदाजीवर त्याने हूक शॉटदेखील खेळले. तो खूप वेगाने प्रगती करत आहे. मला वाटते की, येणाऱ्या पुढील १० वर्षात त्याचे नाव जगातील सर्वोत्कृष्ट सलामी फलंदाजांच्या यादीत असेल.”
शुबमन गिलला इंग्लंडविरुद्ध मिळाली संधी
बीसीसीआयने ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत उत्कृष्ट फलंदाजी केलेल्या शुबमन गिल याला इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेत समाविष्ट करून घेतले आहे. येत्या ५ फेब्रवारीपासून ही मालिका सुरू होत आहे. तसेच सर्वांनाच शुबमन गिलकडून चांगल्या प्रदर्शनाची आशा आहे. तो या मालिकेत किती धावा करतो? याची सर्वांनाच उत्सुकता लागून आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
केकेआरचा शिलेदार नरेनच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन, सोशल मीडियाद्वारे दिली माहिती
चालू सामन्यात फिल्डर कपडे बदलण्यात व्यस्त अन् चेंडू सीमारेषेपार, पाहा मजेशीर व्हिडिओ
शमी नव्हे तर जहां..! मोहम्मद शमीच्या पत्नीने उचललं टोकाचं पाऊल, लेकीच्या नावापुढे लावलं आपलं आडनाव