भारतीय संघाचा दिग्गज अजिंक्य रहाणे पुढच्या महिन्यात इंग्लंड दौऱ्यासाठी निवडला गेला नाहीये. १ जूनपासून सुरू होणाऱ्या कसोटी सामन्यात रहाणेप्रमाणेच वेगवान गोलंदाज इशांत शर्मादेखील सहभागी नसेल. आयपीएल सामन्यादरम्यान रहाणेला दुखापत झाली होती. परंतु या दोघांचे सततचे निराशाजनक प्रदर्शन पाहून निवडकर्त्यांनी हा निर्णय घेतला असावा. आता ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू ब्रॅड हॉग यांनी या दोघांना संघातून वगळण्याविषयी मत व्यक्त केले आहे.
इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघाला एकदिवसीय आणि टी-२० मालिका खेळायच्या आहेत. परंतु मागच्या वर्षी अपूर्ण राहिलेल्या कसोटी मालिकेतील एकमात्र सामना सर्वप्रथम खेळला जाईल. या सामन्यासाठी बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी संघ घोषित केला. या संघात चेतेश्वर पुजाराने पुनरागमन केले, पण अजिंक्य रहाणे (Ajikya Rahane) मात्र पुनरागमन करू शकला नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर या दोघांना संघातून वगळले गेले होते. वेगवान गोलंदाज इशांत शर्मा (Ishant Sharma) देखील या संघात सहभागी नाहीये. ऑस्ट्रेलियन दिग्गज ब्रॅड हॉग (Brad Hogg) यांच्या मते निवडकर्त्यांचा हा निर्णय अगदी योग्य आहे.
त्यांच्या अधिकृत युट्यूब चॅनेलवर बोलताना हॉग म्हणाले की, “मला वाटते की, हा खूप चांगला निर्णय आहे की, निवडकर्त्यांनी रहाणे आणि इशांतला कसोटी संघातून बाहेर केले आहे. या दोन्ही क्रिकेटपटूंचे वय झाले आहे. ते खूप काळापासून चांगले प्रदर्शन करू शकले नाहीयेत. तुम्हाला युवा खेळाडूंना संघात घेण्याची गरज आहे. जेणेकरून त्यांना अनुभवी खेळाडूंकडून अनुभव घेता येईल.”
पुढे बोलताना हॉगने श्रेयस अय्यरचे खूपच कौतुक केले. ते म्हणाले की, “केकेआरचा कर्णधार विराट कोहलीसोबत कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजी करून पुढे जाईल. त्यांनी वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाचेही कौतुक केले. कृष्णाला देखील कसोटी संघात निवडले गेले आहे. श्रेयस अय्यर माजी कर्णधार विराट कोहलीसोबत फलंदाजी करण्यासाठी, कसोटी क्रिकेट समजून घेण्यासाठी आणि गेम प्लॅन विकसित करण्यासाठी त्याच्यासोबत अनेक वर्ष घालवणार आहे.”
भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामना १ ते ५ जून रोजी खेळला जाणार आहे. मागच्या वर्षी संघात कोरोनाने शिरकाव केल्यामुळे कसोटी मालिकेचा शेवटचा सामना स्थगित केला गेला होता. मालिकेत भारताने २-१ अशी आघाडी घेतली असल्यामुळे पुढच्या महिन्यात खेळळा जाणारा शेवटचा सामना निर्णायक ठरणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दक्षिण आफ्रिकेचा युवा खेळाडू कोमातून बाहेर, विजयाचे सेलिब्रेशन करताना घडला होता भयानक किस्सा
कुठपर्यंत जाईल ‘जम्मू एक्सप्रेस’ उमरान मलिकची कारकीर्द? पाहा भारतीय दिग्गजाने काय केलीय भविष्यवाणी