---Advertisement---

ऑस्ट्रेलियन दिग्गजाने केले हार्दिकचे तोंडभरून कौतुक, म्हणाला…..

On: मंगळवार, जून 14, 2022 4:18 PM
Hardik-Pandya-1
---Advertisement---

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सध्या मायदेशातील टी-२० मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारताला पराभव स्वीकारावा लागला. पहिल्या सामन्यात संघातील फलंदाजी चांगले प्रदर्शन केले, तर दुसऱ्या सामन्यात फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले. अष्टपैलू हार्दिक पंड्याने मात्र राष्ट्रीय संघात जोरदार पुनरागमन केले आहे. याच पार्श्वभूमीवर माजी ऑस्ट्रेलियन दिग्गज ब्रॅड हॉगने हार्दिकंचे कौतुक केले आहे.

हार्दिक पंड्या (Hardik Pandya) मागच्या वर्षी टी-२० विश्वचषक खेळल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेमटधून बाहेर पडला होता. विश्वचषकानंतर त्याची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय मालिका आहे. मधल्या काळात त्याने आयपीएल २०२२ मध्ये चांगले प्रदर्शन करून फॉर्म पुन्हा मिळवल्याची पुष्टी केली होती. त्याच्याच नेतृत्वातील गुजरात टायटन्सने यावर्षी आयपीएलचे विजेतेपद पटकावले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात हार्दिकला मोठी खेळी करता आली नाही, पण पहिल्या सामन्यात त्याने अवघ्या १२ चेंडूत नाबाद ३१ धावा केल्या होत्या. त्याच्या या योगदानामुळे भारतीय संघ पहिल्या सामन्यात मोठी धावसंख्या उभी करू शकला होता.

ऑस्ट्रेलिया संघाचा माजी फिरकी गोलंदाज ब्रॅड हॉगने हार्दिकचे प्रदर्शन पाहून त्याला सध्यास्थितीत सर्वात मूल्यवान टी-२०  खेळाडू सांगितले आहे. ब्रॅड हॉग (Brad Hogg) म्हणाला की, “जेव्हा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्याच्या शेवटच्या षटकांमध्ये हॉग फलंदाजी करण्यासाठी आला आणि आल्याबरोबरच त्याने मोठे शॉट्स घेळायला सुरुवात केली. तसेच संघाला गरज पडल्यावर तो वरच्या फलीत फलंदाजी करू शकतो. अनेक खेळाडूंना हे जमत नाही.”

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या टी-२० मालिकेत भारताचे प्रदर्शन आतापर्यंत तरी निराशाजनक राहिले आहे. मालिकेतील पहिल्या  सामन्यात संघातील फलंदाजांनी चांगले प्रदर्शन केले होते, पण गोलंदाज मात्र अपयशी ठरले. तर दुसऱ्या सामन्यात मात्र खेळपट्टी गोलंदाजीसाठी अनुकूल असल्यामुळे संघाला मोठी धावसंख्या उभी करत आली नाही. गोलंदाजांमध्ये भुवनेश्वर कुमार सोडला, तर इतर कोणलाही प्रभाव पाडता आला नाहीये.

उभय संघातील तिसरा टी-२० सामना मंगळवारी (१४ जून) विशाखापटनममध्ये खेळला जाणार आहे. तिसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघ जर पराभूत झाला, तर टी-२० मालिका आफ्रिका संघाच्या नावावर होईल. याच कारणास्तव संघ हा सामना जिंकण्यासाठी पूर्ण ताकदीने मैदानात उतरेल. उमरान मलिक आणि अर्शदीप सिंग यांच्यातील कोणा एकाला पदार्पणाची संधी देखील मिळू शकते.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या –

कितीही ट्रोल केला गेला असला, तरी पॉंटिंगला भावलेला डिंडा भारतासाठी खेळलाच

तब्बल सात वर्षानंतर टीम इंडियावर येणार ‘ती’ नकोशी वेळ?, दक्षिण आफ्रिका ठरणार का कारण

सुशांत सिंग राजपूत होता धोनीचा कट्टर फॅन, ‘या’ वर्षी पहिल्यांदा काढला होता धोनीबरोबर फोटो

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---