ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू ब्रॅड हॉग यांनी सर्वांना चकित करणारा उपाय सुचवला आहे. ते म्हणाले की, कसोटी चॅम्पियनशीपच्या जागी ऍशेस मालिका आणि भारत विरुद्ध पाकिस्तान कसोटी सामन्यांचे आयोजन करायला पाहिजे. हॉग यांच्या म्हणण्यानुसार, असे केल्यास प्रतिस्पर्धा मोठ्या प्रमाणात वाढेल आणि लोकांना रोमांचक सामनेही पाहायला मिळतील.” Brad hogg suggested world test championship should be replaced with ashes and india pakistan test series.
आपल्या यूट्यूब चॅनलवरील एका व्हिडिओत हॉग म्हणाले, “लोकांना आव्हानात्मक क्रिकेट पाहायचे आहे. त्यासाठी कसोटी चॅम्पियनशीप संपवून दुसऱ्या कसोटी मालिकांचे आयोजन करायला हवे. नोव्हेंबर २०२०पासून ते जानेवारी २०२१पर्यंत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात ४ सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. पण, ती मालिका रद्द करायला पाहिजे आणि त्याऐवजी ऍशेस मालिकेचे आयोजन करायला पाहिजे.”
“पण जर ऑस्ट्रेलिया संघ खेळलाच नाही तर भारतीय संघ काय करेल? तेव्हा भारतीय संघाने डिसेंबरमध्ये पाकिस्तान संघाविरुद्ध ४ सामन्यांची कसोटी मालिका खेळायला पाहिजे. यातील २ सामने पाकिस्तानमध्ये आणि २ सामने भारतामध्ये आयोजित करायला हवेत,” असे हॉग पुढे म्हणाले.
भारत-पाकिस्तान कसोटी मालिकेविषयी हॉग म्हणाले, “बऱ्याच काळापासून भारत आणि पाकिस्तान संघादरम्यानच कसोटी मालिका पाहायला मिळाली नाही. त्यामुळे लोक या मालिकेला पाहण्यासाठी उत्सुक आहेत. म्हणून भारत आणि पाकिस्तान संघात कसोटी मालिकेचे आयोजन करायला हवे.”
भारत आणि पाकिस्तान संघादरम्यान बऱ्याच काळापासून कोणतीही द्विपक्षीय मालिका झालेली नाही. दोन्ही देशातील तणावामुळे दोन्ही देश एकमेकांविरुद्ध द्विपक्षीय मालिका खेळत नाही. फक्त आयसीसी स्पर्धांदरम्यान दोन्ही संघात सामना खेळला जातो. अशात हॉग यांचा उपाय सर्वांना चकित करण्याजोगा आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
वय केवळ २६ वर्षेे; किडनी, लिव्हर झालेत फेल आता कोरोना पॉझिटिव्हही…
धोनीच्या काळात खेळलो असलो तरी मी अनलकी नाही – पार्थिव पटेल
रोहित-विराट नाही तर ‘या’ क्रिकेटपटूने मारले आहेत टी२०…