भारतीय संघाचा यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने काही दिवसांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यादरम्यान समालोचन क्षेत्रामध्ये पाऊल टाकले होते. परंतु, दिनेश कार्तिकने समालोचन करताना अशी एक चूक केली. ज्यामुळे दिनेश कार्तिकला त्याच्या बोलण्यावर त्याला खूप लाज वाटली. दिनेश कार्तिकच्या एका वक्तव्यामुळे संपूर्ण क्रिकट जगतात चर्चा झाली होती.
दिनेश कार्तिकने असे केले होते वक्तव्य
दिनेश कार्तिकने इंग्लंड आणि श्रीलंकामध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान समालोचन करताना वक्तव्य केले होते की, ‘असे वाटत आहे की, अनेक फलंदाजांना आपली बॅट आवडत नाही. त्यांना दुसऱ्या फलंदाजाची बॅट आवडत असावी. बॅट म्हणजे शेजारच्या व्यक्तीच्या पत्नीसारखी असते.’ कार्तिकच्या या वक्तव्यामुळे लोकांनी त्यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने टीका करायला सुरुवात केली होती. त्यानंतर कार्तिकने माफी मागितली होती.
"Bats are like a neighbour's wife. They always feel better."
WTAF?! 🤬 pic.twitter.com/E8emRa5RUZ
— Rachel Romain (@RERomain) July 1, 2021
या दिग्गज खेळाडूंनी घेतला आनंद
दिनेश कार्तिकने केलेल्या विधानावर आता ऑस्ट्रेलियाच्या माजी फिरकीपटू ब्रॅड हॉगने ही या वक्तव्याचा आनंद घेतला आहे. हॉगने ट्विट केले की, ‘कार्तिकचे शेजारी आता हाय अलर्टवर आहेत.’ जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यांमध्ये कार्तिकने उत्तम समालोचन केले होते, ज्याचे चाहत्यांकडून खूप कौतुक झाले होते. पण त्याचवेळी कार्तिककडून चूक होताच, त्यांनी त्याच्यावर टीकाही केली.
@DineshKarthik your neighbourhood is on high alert now. 😂🤣
— Brad Hogg (@Brad_Hogg) July 5, 2021
कार्तिकने मागितली माफी
दिनेश कार्तिकला आपण केलेल्या चूकीची लवकर जाणीव झाली. त्यामुळे कार्तिकीने इंग्लंड आणि श्रीलंकामध्ये सुरू असलेल्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यादरम्यान सर्वांची माफी मागितली.
सामन्यादरम्यान तो म्हणाला की,’ काल सामना सुरू असताना जे वक्तव्य केले त्यासाठी मी तुमची सर्वांची माफी मागतो. माझा हेतू चुकीचा नव्हता. परंतु, त्याचा अर्थ दुसरा निघाला. मी त्या सर्वांची माफी मागतो ज्यांनी कोणी माझे हे वक्तव्य ऐकले आहे. माझे हे बोलणे पूर्णपणे चुकीचे होते. मी यासाठी तुम्हा सर्वांची माफी मागतो आणि पुन्हा असे होणार नाही याची मी ग्वाही देतो.’ अशा पद्धतीने समालोचन करताना दिनेश कार्तिकने आपल्या वक्तव्यासाठी सर्वांची माफी मागितली.
महत्त्वाच्या बातम्या –
मायकल वॉन स्वत:लाच म्हणाला, ‘४६ वर्षांचा मॉडेल’; जडेजाने दिली भन्नाट प्रतिक्रिया
अखेर उपरती झाली! उमर अकमलने ‘त्या’ चूकीबद्दल व्हिडिओ शेअर करत मागितली सर्वांची माफी