---Advertisement---

ब्राझिलचा रोनाल्डो बनला ला लीगामधील या क्लबचा मालक

---Advertisement---

ब्राझिलचा माजी फुटबॉलपटू रोनाल्डो नॅझॅरियो ला लीगामधील रियल वॅलाडोलिड या क्लबचा 51% सहमालक बनला आहे. त्याने या क्लबचे अध्यक्ष कार्लोय सुवारेज यांना 30 मिलियन युरो देऊन क्लबचे शेयर्स विकत घेतले.

41 वर्षीय, रोनाल्डो ला लीगामध्ये रियल माद्रीद आणि बार्सिलोना या दोन्ही संघाकडून खेळला आहे.

वॅलाडोलिड चांगली कामगिरी करून ला लीगाच्या या हंगामात प्रवेश केला. या संघाने सध्या सुरू असलेल्या ला लीगामध्ये 3 सामने खेळले असून त्यातील दोन सामने अनिर्णीत तर एका सामन्यात पराभूत झाला आहे.

“हा दिवस माझ्यासाठी खुप महत्त्वाचा आहे. संघाला अजून चांगले तयार करण्याचा प्रयत्न करणार आहे”, असे रोनाल्डो म्हणाला.

तसेच या क्लबला मदत करण्यासाठी आणि सल्ले देण्यासाठी चाहत्यांनी पुढे यावे असेही रोनाल्डोने सुचविले आहे.

“चाहते आम्हाला चांगल्या कल्पना आणि माहिती देऊ शकतात. मला या क्लबच्या सध्याच्या आणि भविष्याचा भाग बनायचा आहे”, असेही रोनाल्डो पुढे म्हणाला.

रोनाल्डोने 2011ला सगळ्या प्रकारच्या फुटबॉलमधून निवृत्ती घेतली. तर त्याला 1996, 1997 आणि 2002ला फिफा प्लेयर ऑफ द इयरचा अवॉर्डही मिळाला आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

भारत विरुद्ध विंडिज संघात लखनऊमध्ये होणारा टी20 सामना या कारणामुळे ठरणार खास

रोहित शर्माने विराट कोहलीला केले सोशल मिडियावर अनफॉलो; चाहत्यांची वाढली चिंता

…म्हणून अॅलिस्टर कूकला इशांत शर्माची विकेट घेतल्याचा झाला पश्चाताप

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment