क्रिकेटविश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. इंग्लंडला एकापाठापोठ दोन धक्के बसले आहेत. इंग्लंडच्या दोन दिग्गज खेळाडूंनी निवृत्ती जाहीर केली. आधी शनिवारी (दि. 29) स्टुअर्ट ब्रॉड याने ऍशेस 2023 कसोटी मालिकेच्या पाचव्या कसोटीतील तिसऱ्या दिवशी निवृत्तीची घोषणा केली होती. त्यानंतर आता सोमवारी (दि. 31 जुलै) इंग्लंडचा स्टार अष्टपैलू मोईन अलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने पाचव्या कसोटीच्या अखेरच्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर हा निर्णय घेतला. या कसोटीत इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला 49 धावांनी पराभवाचा धक्का दिला. तसेच, मालिका 2-2ने बरोबरीत सुटली.
स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) याच्यासोबतच मोईन अली (Moeen Ali) यानेही कसोटी क्रिकेटला रामराम ठोकला आहे. पाचवा कसोटी सामना जिंकल्यानंतर मोईनने माध्यमांशी बोलताना म्हटले की, हा त्याचा अखेरचा कसोटी सामना आहे. खरं तर, मोईनने 2021मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. मात्र, ऍशेस 2023 (Ashes 2023) मालिकेत त्याने पुनरागमन केले होते. आता ऍशेस संपल्यानंतर त्याने पुन्हा एकदा निवृत्ती घेतली आहे. यादरम्यान त्याने बेन स्टोक्स याच्याविषयी भुवया उंचावणारे भाष्यही केले आहे.
त्याने म्हटले आहे की, “जर बेन स्टोक्सने मला पुन्हा खेळण्यासाठी मेसेज केला, तर मी तो मेसेज डिलीट करेल आणि परत येणार नाही.” तो असेही म्हणाला की, “मला कसोटीत पुनरागमन करून चांगले वाटले. नक्कीच धक्कादायकही होते. कारण, मी यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध इतके चांगले खेळलो नव्हतो. इंग्लंडचा मुख्य गोलंदाज जॅक लीच हा ऍशेस मालिकेपूर्वी दुखापतग्रस्त झाला होता. त्यानंतर मला कसोटीत पुनरागमन करण्यासाठी स्टोक्सने मेसेज कॉल केला. खूप विचार केल्यानंतर मी निवृत्तीनंतर पुनरागमन करण्याचा निर्णय घेतला.”
Moeen Ali has confirmed his retirement in Test Cricket. pic.twitter.com/faatku5k49
— CricketMAN2 (@ImTanujSingh) July 31, 2023
Moeen Ali confirms his retirement from Test cricket
🗣️ "I know I'm done. If Stokesy messages me again, I am going to delete it!" 🤣 pic.twitter.com/4CBeOp97qT
— Sky Sports Cricket (@SkyCricket) July 31, 2023
मोईन अलीची कामगिरी
खरं तर, ओव्हल कसोटीत मोईन अलीन याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरच्या डावात 3 विकेट्स घेतल्या. तसेच, इंग्लंडला मजबूती मिळवून दिली. पाचव्या कसोटीत इंग्लंडने 49 धावांनी सामना आपल्या नावावर केला. (breaking moeen ali confirmed his retirement from test cricket second time after ashes 2023)
महत्त्वाच्या बातम्या-
बिग ब्रेकिंग! टी20 मालिकेसाठी 15 सदस्यीय वेस्ट इंडिज संघाची घोषणा, स्टार खेळाडूंचे कमबॅक
इंग्लंडचा दिग्गज माजी कर्णधार ऍलिस्टर कूकचा खळबळजनक खुलासा! म्हणाल, ‘पुनरागमन करणार होतो, पण…’