ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज अॅडम गिलक्रिस्ट २००० च्या दशकातील सर्वोत्तम यष्टीरक्षक फलंदाज होता.
उत्कृष्ट यष्टीरक्षणाबरोबरच आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या गिलक्रिस्टने, कित्येक वेळा विरोधी संघाच्या गोलंदाजांची आपल्या बॅटने धुलाई केली आहे.
अॅडम गिलक्रिस्टला पाहुन भल्या भल्या गोलंदाजांना घाम फुटायचा. मात्र जागतिक क्रिकेटमध्ये असा एक गोलंदाज होता ज्याची गिलक्रिस्टला भिती वाटायची.
याचा उलघडा स्वत: गिलक्रिस्टने एका कार्यक्रमात केला.
“माझ्या संपूर्ण क्रिकेट कारकिर्दीत मुथय्या मुरलीधरन सोडला तर बाकी कोणत्याच गोलंदाजाला खेळताना अडचण आली नाही. मात्र जेव्हा मुरलीधरन समोर असायचा तेव्हा मात्र मला घाम फुटायचा. मला मुरलीधरनचा चेंडू कधीच ओळखता आला नाही.” असे गिलक्रिस्ट म्हणाला.
अॅडम गिलक्रिस्ट ऑस्ट्रेलियाचा सर्वकालिन महान यष्टीरक्षक फलंदाज आहे. त्याने ऑस्ट्रेलियाकडून खेळताना ९६ कसोटी सामन्यात ५५७० धावा केल्या आहेत. तसेच २८७ एकदिवसीय सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करताना गिलक्रिस्टने ९६१९ धावा केल्या आहेत.
अॅडम गिलक्रिस्टने १३ टी-२० सामन्यातही ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले आहे. यामध्ये त्या फक्त २७४ धावा करता आल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
-सचिन तेंडुलकरची नवी इनिंग, इंग्लंडमध्ये सुरु केली क्रिकेट आकादमी






