बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्याकडे पाठवला असून त्यांनी तो स्वीकारला आहे.
मागील दोन ते तीन दिवसांपासून स्टिंग ऑपरेशन दरम्यान केलेल्या गौप्यस्फोटांमुळे चेतन शर्मा (Chetan Sharma) चर्चेत आले होते. तसेच त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका आणि ट्रोलिंग झाली होती. अखेर आज त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
नुकत्याच एका न्यूज चॅनेलने चेतन शर्मा यांचे स्टिंग ऑपरेशन केले होते. यामध्ये मुख्य निवडकर्ते चेतन शर्मा यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले होते. त्यांनी यादरम्यान सौरव गांगुली आणि विराट कोहली यांच्या वादापासून ते खेळाडूंच्या फिट राहण्यासाठी इंजेक्शनचा वापर करण्यापर्यंतची गुपीतं सांगितली होती. त्यांनी हेही सांगितले होते की, हार्दिक पंड्या कर्णधारपदासाठी त्यांना त्यांच्या घरी भेटण्यासाठी येत असायचा.
चेतन शर्मांचे आरोप
खेळाडू घेतात इंजेक्शन
चेतन शर्मा यांनी या संपूर्ण स्टिंग ऑपरेशनमध्ये ज्या एका मुद्द्यावर विस्तृतपणे म्हणणे मांडले ते म्हणजे खेळाडूंचा फिटनेस. अनेक प्रमुख भारतीय खेळाडू पूर्णपणे तंदुरुस्त नसतानाही 80-85 टक्केच तंदुरुस्त असताना, डोपिंगच्या कक्षेत न येणारी इंजेक्शन घेऊन आपण पूर्ण तंदुरुस्त असल्याचे दाखवतात.
विराट-गांगुली वाद
विराट कोहली याने टी20 संघाचे नेतृत्व सोडले तेव्हा सर्व गांगुली यांनी त्याला याचा पुनर्विचार करण्याची विनंती केली होती. मात्र, विराटने त्यानंतर पत्रकार परिषदेत आपल्याला कोणीही विनंती न केल्याचे म्हटले होते. मात्र, ही चर्चा नऊ जणांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठकीत झाल्याचे शर्मा यांनी म्हटले.
अधिक वाचा- ‘आम्ही पाच जण संपूर्ण भारताचे क्रिकेट चालवतो’, स्टिंग ऑपरेशनमध्ये चेतन शर्मांची बडी बात
या प्रकरणाचे गांभीर्य पाहून बीसीसीआयकडून स्पष्ट करण्यात आले होते की, चेतन शर्मा यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल. माध्यमांतील वृत्तांनुसार, चेतन शर्मा यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी देण्यात येईल, परंतु त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई केली जाणार आहे.
भारतीय क्रिकेटसाठी चिंतेचा विषय हा आहे की, निवडकर्त्यांना बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) कसोटीतील शेवटच्या दोन सामन्यांसाठी संघाची घोषणा करायची आहे. या संदर्भात बैठकही होणार होती. मात्र, आता याविषयी काय निर्णय घेतला जातो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (breaking news Chetan Sharma steps down as chief selector read more)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पहिल्या कसोटीनंतरच मावळला भारताचा ‘सूर्य’, आता परत टीम इंडियात येण्यासाठी पाहावी लागणार 12 वर्षे वाट?
नाणेफेकीचा कौल जिंकत ऑस्ट्रेलिया करणार बॅटिंग, टीम इंडियात ‘या’ पठ्ठ्याचे पुनरागमन