इंग्लंड क्रिकेट संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे. तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी संघ याठिकाणी आला असून मालिकेतील पहिले दोन्ही सामने इंग्लंडने जिंकले आहेत. सामन्यातील तिसरा कसोटी सामना शनिवारी (17 डिसेंबर) कराचीमध्ये सुरू झाला. या सामन्याच्या एक दिवस आधी म्हणजेच शुक्रवारी इंग्लंडचा प्रशिक्षक ब्रँडन मॅक्युलम आणि त्यांचा कर्णधार बेन स्टोक्स यांच्यात एक खास स्पर्धा खेळली गेला, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मालिकेतील पहिले दोन्ही कसोटी सामने इंग्लंडने जिंकले असून मालिका देखील नावावर केली आहे. उभय संघातील तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना कराचीमध्ये खेळला जात असून पहिल्या दिवशी पाकिस्तान 304 धावा करून सर्वबाद झाला. हा सामना सुरू होण्याच्या एक दिवस आधी बेन स्टोक्स (Ben Stokes) आणि ब्रँडन मॅक्युलम (Brendon McCullum) यांच्यात षटकार मारण्याची स्पर्धा खेळली गेली. या स्पर्धेचा निकाल पाहून चाहते आश्चर्य व्यक्त करत आहेत. इंग्लंड क्रिकेटच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे.
संघाचा प्रशिक्षक मॅक्युलम आणि कर्णधार स्टोक्स यांना प्रत्येकी 5-5 चेंडू खेळायला मिळाले, ज्यावर त्यांना षटकार मारायचे होते. बेन स्टोक्सने या पाच चेंडूवर केलेली कामगिरी चाहत्यांना निराश करणारी होती. तर दुसरीकडे वयाच्या 41 व्या वर्षी मॅक्युलम मात्र त्याच रंगात खेळताना दिसला, जसा तो न्यूझीलंड संघासाठी खेळत असायचा. आश्चर्याची गोष्ट ही होती की, स्टोक्सने पहिलाच चेंडू गमावला. स्टोक्स पाच पैकी फक्त दोन चेंडूंवर षटकार मारू शकला. दुसरीकडे मॅक्युलमने मात्र पाच पैकी चार चेंडूंवर षटकार मारले.
https://www.instagram.com/reel/CmPM-QAD4Tg/?utm_source=ig_web_copy_link
दोघांचे पाच पाच चेंडू संपल्यानंतर स्टोक्स स्वतःच्या प्रदर्शनावर नाराज असल्याचे दिसून आले. त्याने रागाच्या भरात हातातील बॅट फेकली आणि शरमने मान देखील खाली घातली. इंग्लंड क्रिकेटने शेअर केलेल्या या व्हिडिओवर चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर देखील केला जात आहे. (Brendon McCullum beats Ben Stokes in six-hitting challenge)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पॉंटिंगने केलेली भविष्यवाणी खरी ठरली, क्षेत्ररक्षणाची रचना पाहूनच सांगितली होती ‘ही’ गोष्ट
यजमानांचा पलटवार, डाव घोषित करण्याच्या घाईने भारत धोक्यात! शांतो-हसनची विक्रमी भागीदारी