शनिवारी(1 डिसेंबर) सोशल मिडियावर न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू नॅथम मॅक्यूलमच्या निधनाच्या बातमीने खळबळ उडवली होती. मात्र त्यानंतर काही वेळातच नॅथनने आपण जिवंत आहोत, असा खुलासा करत ही बातमी खोटी असल्याचे सांगितले आहे.
नॅथनने त्याच्या निधनाची बातमी खोटी असल्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्ट करताना त्याचा सेल्फी घेतलेला फोटो शेअर केला आहे. मात्र त्याचा लहान भाऊ ब्रेंडन मॅक्यूलमला मात्र ही बातमी ऐकून राग अनावर झाला आहे.
त्यानेही नॅथनच्या निधनाची बातमी अफवा असल्याचे सांगत ही अफवा पसरवणाऱ्याला मी शोधून काढेल असे म्हटले आहे.
नॅथनने पहिल्यांदा ही बातमी अफवा असल्याचे सांगताना ट्विट केले आहे की, ‘मी जिंवत आहे आणि पहिल्यापेक्षाही चांगला जगत आहे. मला माहित नाही ही बातमी कोठून आली पण ही बातमी खोटी आहे.’
या ट्विटबरोबरच त्याने त्या खोट्या बातमीचा फोटो आणि त्याचा सेल्फी घेतलेला फोटो शेअर केला आहे. जेणेकरुन हे सिद्ध होईल की तो जिवंत आहे.
https://twitter.com/MccullumNathan/status/1068797155685523456
ब्रेंडन मॅक्यूलमला मात्र त्याच्या भावाच्या मृत्यूची खोटी बातमी ऐकून दु:ख झाले आणि धक्का बसला होता. त्यामुळे त्याने ट्विट केले आहे की ‘आज कोणीतरी ठरवले की सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्या भावाच्या निधनाची बातमी पसरवायची. मी न्यूझीलंडला जाण्यासाठी विमानात होतो आणि त्यावेळी हे पाहून मला धक्का बसला. या बातमीतील काहीही खरे नाही. ज्याने कोणी हे केले आहे, मी त्याला कसेही आणि कोठूनही शोधून काढेल.’
https://twitter.com/Bazmccullum/status/1068854050106601472
ब्रेंडन मॅक्यूलम सध्या शारजामध्ये सुरु असणाऱ्या टी10 लीगमध्ये राजपूत संघाकडून खेळत होता. पण त्याचा संघ शुक्रवारी (30 नोव्हेंबर) नॉर्थन वॉरियर्स विरुद्ध पराभूत झाल्याने या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्यामुळे ब्रेंडन शनिवारी न्यूझीलंडला परत येत होता.
ब्रेंडन आणि नॅथन मॅक्यूलम हे दोघेही भाऊ न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहेत. ब्रेंडनने न्यूझीलंडकडून 101 कसोटी, 260 वनडे आणि 71 टी20 सामने खेळले आहेत. तसेच नॅथनने 2016 मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून त्याने न्यूझीलंडकडून 84 वनडे आणि 63 टी20 सामने खेळले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
–तब्बल १२८ वर्षांनंतर क्रिकेटमध्ये घडला असा दुर्मिळ पराक्रम
–दक्षिण आफ्रिकेच्या स्टेनगनचे ऑस्ट्रेलिया-भारत कसोटी मालिकेबद्दल मोठे वक्तव्य
–कसोटी मालिकेत विराटपेक्षा हा खेळाडू करणार सर्वाधिक धावा, आॅस्ट्रलियाच्या दिग्गजाची भविष्यवाणी