क्रिकेटमध्ये आपला संघ जिंकावा यासाठी खेळाडू जीवापाड मेहनत घेत असतात. ते संघासाठी हवं ते करण्यासाठी तयार असतात. परंतु, काही लोक मैदानाच्या बाहेरून सामन्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे ते खेळाडूंना स्पॉट फिक्सिंग करण्यासाठी प्रोत्साहित करत असतात. असाच काहीसा प्रकार झिम्बाब्वे (Zimbabwe) संघाचा माजी कर्णधार ब्रेंडन टेलर (Brendon Taylor) सोबत घडला होता. ज्याचा खुलासा त्याने सोशल मीडिया पोस्टद्वारे केला आहे.
ब्रेंडन टेलरने (Brendon Taylor statement) सांगितले की, ही घटना ऑक्टोबर २०१९ मध्ये घडली होती. ज्यावेळी झिम्बाब्वे संघ संघातील खेळाडू आर्थिक अडचणीत सापडले होते. त्यावेळी क्रिकेट बोर्डाकडे खेळाडूंचे मानधन देण्याइतके देखील पैसे नव्हते. त्यावेळी भारतातील एका उद्योगपतीने झिम्बाब्वेमध्ये एक टी२० लीग स्पर्धा सुरू करण्यासाठी संपर्क केला होता. त्यावेळी क्रिकेटपटूला भारताचा दौरा करण्यासाठी १५ हजार डॉलर्स देण्यात आले होते.
ब्रेंडन टेलरने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, “मी त्यावेळी सावध होतो. परंतु, वेळी अशी होती की, झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डने ६ महिन्यांपासून आमचे मानधन दिले नव्हते. हे देखील निश्चित नव्हते की, झिम्बाब्वे संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुरू ठेवणार की नाही. हेच कारण होते की, मी भारताचा दौरा केला. त्यावेळी चर्चा देखील झाली. एक उद्योगपती मला मौज करण्यासाठी डिनरला घेऊन गेला.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “आम्ही त्यावेळी मद्यपान केले होते. त्यानंतर त्याने मला कोकिन दिली. त्याने आधीच कोकिनचे सेवन केले होते. मी मूर्खपणा करत कोकीनचे सेवन केले. त्यानंतर सकाळी तेच लोक माझ्या हॉटेलच्या रूममध्ये आले आणि मला व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल करू लागले. ते म्हणाले होते की, आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये आमच्यासाठी स्पॉट फिक्सिंग कर, अन्यथा हा व्हिडिओ आम्ही व्हायरल करू.”
https://twitter.com/BrendanTaylor86/status/1485522867768991745
या सर्व घटनेनंतर ब्रेंडन टेलर मानसिक दबावात आला होता. इतक्या दबावात असताना देखील त्याने कुठल्याही प्रकारची फिक्सिंग केली नाही असे त्याचे म्हणणे आहे. तो पुढे म्हणाला की, “क्रिकेट एक सुंदर खेळ आहे. माझे खेळावरील प्रेम हे भीती पेक्षा खूप जास्त आहे.”
महत्वाच्या बातम्या :
राहुल खरोखरच तुम्हाला कर्णधार वाटतो का? बीसीसीआय अधिकाऱ्याचा पत्रकाराला प्रतिप्रश्न
अख्तर म्हणतोय,”टी२० विश्वचषकात पाकिस्तान पुन्हा भारताला हरवेल”
हे नक्की पाहा: