ऑस्ट्रेलिया संघाचा वेगवान गोलंदाज ब्रेट ली (Brett Lee) हा जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. तो गोलंदाजीला येताच फलंदाज अडचणीत यायचा. आपल्या वेगवान गोलंदाजीच्या जोरावर त्याने अनेक दिग्गजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. परंतु एक असा फलंदाज होता, ज्याच्यासमोर स्वतः ब्रेट ली देखील अडचणीत यायचा. याचा खुलासा स्वतः ब्रेट लीने केला आहे.
हा फलंदाज दुसरा तिसरा कोणी नसून भारतीय संघाचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (sachin tendulkar) होता. अनेक दिग्गज फलंदाजांना बाद करणारा ब्रेट ली सचिन तेंडुलकर फलंदाजीला असताना अडचणीत यायचा. त्याला सचिन तेंडुलकरला गोलंदाजी करायला आवडत नव्हते.(Brett Lee statement on sachin tendulkar)
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात होणारा सामना नेहमी रोमांचक असायचा. कारण या दोन्ही संघात अनेक दिग्गज खेळाडू होते. तसेच याच सामन्यात सचिन तेंडुलकर आणि ब्रेट ली यांचा सामना पाहायला मिळायचा. ब्रेट लीने सचिन सचिन तेंडुलकरला आपल्या कारकीर्दीत १४ वेळेस बाद करत माघारी धाडले होते. आता शोएब अख्तरच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना ब्रेट लीने सचिन तेंडुलकरबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.
ब्रेट ली म्हणाला की, “मला सचिनला गोलंदाजी करायला आवडत नसे, कारण तो खूप चांगला होता. त्याच्याकडे खूप चांगले तंत्र होते. मी नेहमी फिरकी गोलंदाजांविरुद्ध फलंदाजी करताना अडचणीत यायचो. त्यामुळे मला मुथय्या मुरलीधरन सारख्या गोलंदाजाचा सामना करायचा नव्हता. मला त्याची गोलंदाजी कधी समजलीच नाही.”
तसेच प्रश्नांची उत्तर देत तो पुढे म्हणाला की, “मला वेगवान गोलंदाजांविरुद्ध फलंदाजी करायला आवडायचे. तसेच जॅक कॅलिस सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहे. यात काहीच शंका नाही की, तो आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू आहे. तसेच मला भारतात खेळायला खूप आवडतं. मी जास्तीत जास्त वेळ भारतात घालवला आहे.”
महत्वाच्या बातम्या:
U19 क्रिकेट विश्वचषक: अफगाणिस्तानचे स्वप्न भंगले; २४ वर्षांनंतर इंग्लंड अंतिम फेरीत
मेगा ऑक्शनमध्ये ‘या’ दहा मार्की खेळाडूंसाठी दिसणार ऍक्शन!
सुपर से भी ऊपर! दक्षिण आफ्रिकी खेळाडूने हवेत टिपला भारी झेल; आयसीसीही म्हणे, ‘सर्वोत्तम झेल’