अर्शदीप सिंग हा फार कमी वेळात नावारुपास आलेेला गोलंदाज आहे. टी20 विश्वचषकाच्या आधी भारतीय संघात पदार्पण करणाऱ्या या डावखुऱ्या गोलंदाजाने आतापर्यंत खेळलेल्या 23 टी20 सामन्यात 33 विकेट्स घेतल्या. अर्शदीपला नव्या आणि जुन्या अशा दोन्ही चेंडूंनी गडी बाद करण्याची कला अवगत आहे. त्याच्या याच गोष्टीमुळे ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ब्रेट ली हा देखील त्याचा चाहता झाला, पण त्याने एक चेतावणी देखील दिली. तो म्हणाला की या खेळाडूला गरजेपेक्षा जास्त सल्ल्यापासून लांब ठेवले पाहिजे, कारण यामुळे अर्शदीपवर विपरीत परिणाम पडू शकतो.
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ब्रेट ली (Brett Lee) याने आपल्या यू ट्यूब चॅनलवर सांगितले की, “कधी कधी संघाला माहिती नसते की या युवा खेळाडूंसोबत कसे वागायला हवे. आपण याआधी देखील पाहिले आहे की जेव्हा एखादा युवा खेळाडू संघाशी जोडल जातो, तेव्हा त्याला संघातील खेळाडू, समालोचक आणि एवढच नव्हे तर हॉटेलमध्ये देखील त्यांना सल्ले दिले जातात. सर्व जण त्या गोलंदाजाच्या भल्यासाठी सांगत असतात, पण अशा गोष्टी त्याच्यावर विपरीत परिणाम करु शकतात. त्यामुळे अर्शदीपला जास्तीच्या सल्ल्यांपासून लांब ठेवण्याची जबाबदारी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा याची आहे.”
अर्शदीपला जास्त जिमची गरज नाही
ब्रेट ली यानेे अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) याला फिट राहण्यासाठी जास्त जिम न करण्याचा सल्ला दिला. ली म्हणाला की, “काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्यामुळे अर्शदीपला त्याच्या ऍक्शनमध्ये मदत मिळू शकते आणि तो जास्त विकेटही मिळवू शकतो. माझा त्याला पहिला सल्ला आहे की त्याने जिममध्ये जास्त वेळ देऊ नये. आपल्या स्नायूंविषयी काळजी करण्याची गरज नाही, कारण त्यामुळे वेगवान गोलंदाजी करण्यात मदत मिळणार नाही.”
सोशल मिडीयामुळे अर्शदीपचे लक्ष विचलीत होऊ नये
अर्शदीपने आपली कारकीर्द नुकतीच सुरु केली आहेे. आशिया चषकाच्या सुपर-4च्या सामन्यात त्याने आसिफ अली याचा एक झेल सोडला होता. ज्यानंतर अर्शदीपला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलेले. लीने अर्शदीपला सल्ला दिला की सोशल मिडीयावर दुर्लक्ष करावा आणि नोटिफिकेशनही बंद करावे. ब्रेट ली याला वाटते की अर्शदीपने देशांतर्गत क्रिकेट जास्त खेळून आपल्या कौशल्यावर काम करावे. (Brett Lee adviced Arshdeep to avoid over workout)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दिलदार ऋतुराज! स्वतःचा सामनावीर पुरस्कार राजवर्धनला देत जिंकली सर्वांची मने
पाकिस्तानात खेळायचा एक रुपयाही घेणार नाही स्टोक्स! कारण वाचून कराल कौतुक