ऑस्ट्रेलिया संघाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली (Brett Lee) याने अनेक दिग्गजांना बाद करत माघारी धाडले आहे. तो जेव्हा गोलंदाजीला यायचा त्यावेळी भले भले दिग्गज खेळाडू थरथर कापायचे. अचूक टप्प्याच्या चेंडू आणि भन्नाट वेग ही त्याच्या गोलंदाजीची खासियत होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर तो खूप कमी वेळेस मैदानावर गोलंदाजी करताना दिसून आला आहे. आता सध्या सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो आपल्या गोलंदाजीने आपल्याच मुलाची दांडी उडवताना दिसून येत आहे.(Brett Lee viral video)
आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम केल्यानंतर ब्रेट ली आपल्या कुटुंबासह वेळ घालवताना दिसून येत असतो. सध्या तो आपल्या मुलासोबत मस्ती करताना दिसून आला आहे. अनेक दिग्गज क्रिकेटपटूंसह क्रिकेट खेळलेला ब्रेट ली आपल्या मुलासह अंगणात क्रिकेट खेळताना दिसून आला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
ब्रेट ली सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टीव्ह असतो. तो सोशल मीडियाद्वारे नेहमीच आपल्याच दैनंदिन आयुष्यातील काही फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो. नुकताच शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो आपला मुलगा प्रेस्टन चार्ल्सला गोलंदाजी करताना दिसून आला आहे. या व्हिडिओमध्ये प्रेस्टन चार्ल्स फलंदाजी करताना दिसून येत आहे, तर ब्रेट लीने यादरम्यान भन्नाट वेगाने यॉर्कर चेंडू टाकला आणि मधली यष्टी उडवली. (Brett Lee clean bowled his son)
ब्रेट लीच्या चेंडूने उडवली मधली यष्टी
ब्रेट लीने टाकलेल्या चेंडूवर त्याच्या मुलाने खेळण्याच्या प्रयत्नही नाही केला. त्याने स्वतःचा बचाव करत पाय मागे घेतला. ज्यामुळे या चेंडूवर मधली यष्टी उडाली. हा व्हिडिओ फॉक्स क्रिकेटने सांगा आपल्या अधिकृत सोशल मीडियावर अकाऊंटवर शेअर केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
केएल राहुलने सांगितली राज की बात! फलंदाजीत ‘हा’ बदल केल्याने मिळाले यश
तब्बल १ तास स्टीव्ह स्मिथ अडकला लिफ्टमध्ये, लॅब्युशेनने फटीतून दिले खायला, पाहा व्हिडिओ
हे नक्की पाहा :





