मुंबई । आयपीएल 2020 मोसमासाठी भारतीय संघाचा माजी प्रशिक्षक कुंबळे यांना माईक हसनच्या जागी किंग्स इलेव्हन पंजाबचा प्रशिक्षक बनविण्यात आले आहे. हेसन यावर्षी रॉयस चॅलेंजर्स बंगळुरूचा प्रशिक्षक आहे. कुंबळे हे यापूर्वी बंगळुरूचे सहाय्यक प्रशिक्षक आणि मुंबई इंडियन्सचे मार्गदर्शक होते. किंग्ज इलेव्हन पंजाब अशा काही आयपीएल संघांपैकी एक आहे ज्यांना एकदाही आयपीएलचे विजेतेपदही जिंकता आले नाही.
ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट लीचा विश्वास आहे की किंग्ज इलेव्हन पंजाबचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळेचे ज्ञान आणि अनुभव संघाला मदत करेल. आयपीएलचा 13 वा मोसम 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे होणार आहे. यावेळी लीने सांगितले की, किंग्स इलेव्हन पंजाब संघ यावर्षी आयपीएलचे विजेतेपद जिंकू शकेल.
स्टार स्पोर्ट्स शो क्रिकेट कनेक्टेडमध्ये बोलताना ली म्हणाला की, ‘कुंबळेसारखा प्रशिक्षक असला तर संघ नक्कीच खूप मजबूत होईल. त्याचे ज्ञान, त्याचा अनुभव संघाला नक्कीच मदत करेल. पंजाबला जिंकणे आवश्यक आहे, तो एक चांगला संघ आहे. त्यांच्याकडे एक चांगले खेळाडू आहेत. ते जेतेपद जिंकण्याच्या अगदी जवळ आहेत. पण पंजाब संघ अद्याप आपली लय पकडू शकलेला नाही. मी विजेतेपद मिळवण्याची वाट पाहत आहे. हा संघ खूप चांगला आहे.’
ट्रेंडिंग लेख –
ब्युटी विथ ब्रेन! पहा नक्की कोण आहे भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहलची होणारी पत्नी
या १० फलंदाजांनी कसोटी क्रिकेटमध्ये मारलेत सर्वाधिक षटकार; एका भारतीयाचाही आहे समावेश
अशी ४ कारणं, ज्यामुळे राजस्थान आहे आयपीएलचा सर्वात प्रबळ दावेदार
महत्त्वाच्या बातम्या –
सचिन, गांगुली, सेहवाग नाही तर ‘या’ भारतीय फलंदाजाविरुद्ध गोलंदाजी करताना शोएब अख्तरला यायचे टेंशन
३० शतके आणि २५० विकेट्स घेणारा ‘हा’ खेळाडू गाजवणार रणजी क्रिकेट
इंग्लंडने पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर भारताला निर्माण झाला हा धोका