---Advertisement---

इंग्लंडने पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर भारताला निर्माण झाला हा धोका

On: सोमवार, ऑगस्ट 10, 2020 1:42 PM
---Advertisement---

मुंबई । पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानला तीन गडी राखून पराभूत केले. जोस बटलर आणि ख्रिस वॉक्स यांच्या संघर्षपूर्ण अर्धशतकाच्या जोरावर यजमानांनी तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. दुसर्‍या डावात 277 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची 5 बाद 117 धावा अशी दयनीय अवस्था झाली होती. सामना पाकिस्तानच्या बाजूने झुकू लागला असे वाटत असताना, बटलर आणि वोक्सच्या शतकी भागीदारीने इंग्लंडने हा सामना सहज जिंकला.

मात्र इंग्लंडच्या या विजयाने भारत आणि ऑस्ट्रेलियाची चिंता वाढली आहे. या विजयामुळे इंग्लंडने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेमधील तिसर्‍या क्रमांकावर आपले स्थान आणखी मजबूत केले. यात भारत पहिल्या स्थानावर आहे. या विजयामुळे इंग्लंडने दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियामधील गुणांचे अंतर कमी केले.

या विजयानंतर इंग्लंडला 40 गुण मिळाल्याने आता त्यांचे 266 गुण झाले आहेत आणि त्यामुळे जर पाकिस्तान विरुद्धचा दुसरा कसोटी सामना जिंकला तर इंग्लंड ऑस्ट्रेलियाला टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत खाली खेचेल. तसेच इंग्लंड यासह भारतीय संघाच्याही अगदी जवळ येईल. सध्या भारत 360 गुणांसह अव्वल स्थानी आहे. तर ऑस्ट्रेलिया 296 गुणांसह दुसर्‍या स्थानावर आहे.

तसेच या गुणतालिकेत न्यूझीलंड 180 गुणांसह चौथ्या आणि पाकिस्तान 140 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.

भारताने 4 मालिका खेळल्या – 

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारताने आतापर्यंत चार मालिका खेळल्या असून 9 पैकी 7 सामने जिंकले तर दोन सामने गमावले आहेत. ऑस्ट्रेलियाने तीन मालिका खेळल्या. यातील 10 पैकी 7 सामने जिंकले तर एक सामना अनिर्णित दोन सामने गमावले. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील इंग्लंडची ही चौथी मालिका असून सध्या या मालिकेत 2 सामने शिल्लक आहेत. पण इंग्लंडने शेवटच्या 12 पैकी 8 सामने जिंकले. एक सामना अनिर्णित होता आणि चार सामने पराभूत झाले.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये प्रत्येक संघाला 3 परदेशात आणि 3 मायदेशात कसोटी मालिका खेळायच्या आहेत. प्रत्येक मालिकेसाठी 120 गुण आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

आयसीसी क्रमवारीत ख्रिस वोक्सची मोठी झेप; आर अश्विनला धोका

पाकिस्तान संघासाठी ब्रिटनमधील फॅन चक्क स्टेडियमबाहेर वाजवत होता ‘सेक्सोफोन’

इंग्लंडला बसला मोठा झटका; हा अष्टपैलू खेळाडू पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेतून पडला बाहेर

ट्रेंडिंग लेख –

या १० फलंदाजांनी कसोटी क्रिकेटमध्ये मारलेत सर्वाधिक षटकार; एका भारतीयाचाही आहे समावेश

आयपीएलमध्ये एकही षटकार मारता न आलेले 3 खेळाडू

अशी ४ कारणं, ज्यामुळे राजस्थान आहे आयपीएलचा सर्वात प्रबळ दावेदार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---